• Thu. Jun 25th, 2026

मांजरा धरणाचे जलपूजन समस्त शेतकरी बांधवांच्या हस्ते संपन्न.

Bybaba maske

Sep 26, 2024

मांजरा धरणाचे जलपूजन समस्त शेतकरी बांधवांच्या हस्ते संपन्न.

रोखठोक न्युज वार्ताहर 

दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 10.00 वा. मांजरा प्रकल्प 96.05% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने मांजरा प्रकल्पाचे 2 वक्रद्वारे 0.25 मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात 1730 क्यूसेक्स (49.00 क्यूमेक्स )इतका विसर्ग सोडण्यात येत आहे.

तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.असे नियंत्रक यांनी सांगितले आहे 

तरी, मांजरा नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, ही विनंती.करण्यात आली आहे, तरी, आज धरण पुर्ण भरल्यामुळे मांजरा धरणाचे जलपूजन समस्त शेतकरी बांधवांच्या हस्ते संपन्न झाले .यावेळी, उपस्थित राहुल खोडसे, गोविंद सोमवंशी, शशिकांत खोडसे, शंकर गुजर,विजय जाधव,शशिकीरण धागे,हनुमंत खोडसे, पांडुरंग सोमवंशी मनोज गुजर,गणेश गुजर,विशाल खोडसे, अतिष खोडसे, सचिन गुजर,सोमनाथ गुजर,बाबा गुजर उमेश गुजर यश सोमवंशी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!