• Tue. Aug 25th, 2026

केज बसस्थानकात प्रवाशाचा खिसा कापला;रोख ४९ हजार ५०० रुपये बसस्थानकातील पोलीस चौकी शोभे साठी बांधली का?

Bybaba maske

Sep 27, 2024

केज बसस्थानकात प्रवाशाचा खिसा कापला;रोख ४९ हजार ५०० रुपये

बसस्थानकातील पोलीस चौकी शोभे साठी बांधली का?

रोखठोक न्युज वार्ताहर 

 केज तालुक्यातील वरपगाव येथील शेतकरी आश्रुबा दादाराव भालेराव (वय ६५) हे १९ सप्टेंबर रोजी दुपारी केज बसस्थानकात आले. त्यांच्या खिशात सोयाबीन विकलेले रोख ४९ हजार ५०० रुपये होते. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचा खिसा कापला आणि सर्व पैसे लंपास केले. हा प्रकार बसमध्ये बसल्यानंतर भालेराव यांच्या लक्षात आला. त्यांनी बसमधून उतरत पुन्हा केज गाठले. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.केज बसस्थानकात चोरीचे प्रमाण वाढत आहे.गेल्या काही दिवसापूर्वीच तहसीलदारांच्य पत्नीचे सोने चोरीला गेले होते. अश्याच प्रकारे आठवड्यात एकदा तरी चोरी होते या कडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.केज बसस्थानकात पोलीस चौकी आहे पण तिथे कोणाचीच पोलीस डियूटी लावलेली नसल्या कारणाने ती सदा बंद असते.त्यामुळेच चोरांचे धर्य वाढत आहे.केज बसस्थानकात तात्कळ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असे प्रवासी मागणी करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!