• Thu. Jun 25th, 2026

अंबाजोगाईत पिस्टलसह एकास घेतले ताब्यात. बीड जिल्ह्यात गावठी पिस्तूल सापडायचे सत्र संपेना?

Bybaba maske

Sep 27, 2024

अंबाजोगाईत पिस्टलसह एकास घेतले ताब्यात.

बीड जिल्ह्यात गावठी पिस्तूल सापडायचे सत्र संपेना?

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड : जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे यशवंतराव चव्हाण चौकात गावठी कट्टा (पिस्टल) जप्त करत एकास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बीड स्थानिक गुन्हे शाखेने केली.

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी बीडचा पदभार घेतल्यापासून कारवायांचा धडाका सुरू केला आहे. या कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे करणारे आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. नुकतेच पाडसिंगी आणि उमापूर येथे तलावारींचा साठा जप्त केला. परळी शहरात गावठी पिस्तूल मिळून आले होते यानंतर अंबाजोगाई येथे एकजण कंबरेला गावठी कट्टा (पिस्टल) लावून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी एक पथक अंबाजोगाई येथे पाठविले या पथकाने अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकात संशयित व्यक्तीला पकडून झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा पिस्टल आणि जिवंत कारतूस असे एकूण ४४ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. तो जप्त करुन आरोपी अमित उर्फ सोन्या सुंदर गायकवाड रा. सदर बाजार अंबाजोगाई यास ताब्यात घेतले. सदरील आरोपीवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखा पोनि उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली ग्रेपोउपनि हनुमान खेडकर, पोह मारुती कांबळे, राजु पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड व चालक गणेश मराडे यांनी केली आहे.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!