• Wed. Apr 29th, 2026

केजध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार वस्तीगृहात राहणाऱ्या नववीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार : मुलगी एक महिन्याची गरोदर

Bybaba maske

Sep 28, 2024

केजध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वस्तीगृहात राहणाऱ्या नववीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार : मुलगी एक महिन्याची गरोदर

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज (बीड) :- वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या मुलीला बाहेर बोलावून तिला दोघांनी मोटार सायकल बसवून एका लॉजच्या पाठीमागे मोकळ्या जागेत नेवून तिच्यावर ओळखीच्या एकाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली असून ती अल्पवयीन मुलगी एक महिन्याची गरोदर असल्याचीही माहिती समोर येत आहे.

बीड तालुक्यातील एक महिला ही तिचा नवरा दारू पीत असल्याने नवऱ्याशी पटत नसल्याने मागील दहा वर्ष पासून एक मुलगी व मुलांसह माहेरी राहत आहे. तिची साडे चौदा वर्ष वयाची मुलगी केज येथील कन्या प्रशाला केज येथे ७ वी पासून शिक्षण घेत आहे. ती आता ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. ती मुलींचे वस्ती गृहात राहून शिक्षण घेत आहे.

दरम्यान त्या अल्पवयीन मुलीच्या आजोळा शेजारी राहत असलेला सनि उर्फ स्वप्नील पाडळे याची चांगली ओळख आह. ती मुलगी गावाकडे अधुन मधुन गेल्या नंतर तो तिच्या आईचे मोबाईलवर फोन करीत असे. त्यामुळे त्यांचे अधुन मधुन बोलणे होत असे. असायचे त्यामुळे त्याची व त्या मुलीची मैत्री होती.

दि. २१ सप्टेंबर रोजी वस्तीगृहाला सुट्टी असल्यामुळे ती आजोळी आईकडे गेली होती.

त्या नंतर दि. २४ सप्टेंबर रोजी मुलीच्या तिच्या आईने तिला सकाळी १०:०० वस्तीगृहा मध्ये सुमारास आणून सोडले. त्या नंतर थोड्याच वेळात १०:१५ वाजता सनि उर्फ स्वप्नील पाडळे व अमोल अंकुश जाधव हे वस्तीगृहाचे बाहेर आले. ते म्हणाले की, तुझे दुखत असल्यामुळे तुझ्या मामाने तुला सरकारी दवाखाना केज येथे बोलवले आहे. असे खोटे बोलुन त्यांनी तिला त्यांचे मोटार सायकलवर बसवुन केज येथील अंबाजोगाई रोडवरील सुजीत लॉजच्या पाठीमागे नेले. तीला व सन्नी उर्फ स्वप्नील पाडळे याला त्या ठिकाणी सोडुन अमोल अंकुश जाधव निघुन गेला. 

त्या नंतर ती मुलगी सन्नी उर्फ स्वप्नील पाडळेला म्हणाले की, “मला येथे कशाला आणले?” तेव्हा तो तीला म्हणाला की, “तुझे मामा येणार आहेत.” असे म्हणाला म्हणून ती त्याच्या सोबत तेथे थांबली. दिवसभर तीला तेथे बसवल्या नंतर बराच वेळ झाला; परंतु तीचा मामा आले नाहीत. तेव्हा ती त्याला म्हणाली की, “मामा आले नाहीत. मला आता वस्तीगृहावर नेवुन सोड.” असे म्हणताच तो तिला म्हणाला की, “माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु मला आवडतेस.” असे म्हणुन त्याने तिच्या ईच्छे विरूध्द रात्री अंदाजे ९:०० वा. च्या सुमारास बळजबरीने शारीरीक संबंध केले. 

त्या नंतर तिने आरडा ओरडा केला; तेव्हा लॉज येथील दोन ईसम तेथे आले. त्यांनी तिला काय झाले? असे विचारले असता तिने त्यांना काही सांगीतले नाही. तिने आईला फोन लावायचा आहे असे म्हणाली. त्यापैकी एका जणाचे मोबाईल वरून तिने तिच्या आई फोन करून घटने बाबत संगीतले. 

त्या नंतर सनि उर्फ स्वप्नील याने तिला त्याचे मोटार सायकलवर दहीफळ फाटा येथे नेवून सोडले आणि तो तेथुन निघुन गेला. त्या नंतर ती मुलगी पायी चालत घरी गेली. रात्री उशीरा तिने हा प्रकार आई, मामा आणि नातेवाईकांना घडलेला सर्व प्रकार सांगीतला. 

त्या नंतर दिं. २६ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून सन्नी उर्फ स्वप्नील पाडळे आणि त्याला मदत करणारा त्याचा मित्र अमोल जाधव यांच्या विरुद्ध गु. र. नं. ५१५/२०२४ भा. न्या. सं. १३७, ६४, ६५(१), ३(५) यासह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२, १७ नुसार गुन्हा दाखल आला आहे. 

या प्रकरणी पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!