वाल्मीक कराड यांना एक कोटी ६९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली.
पावणेदोन कोटींना फसवले; रामकृष्ण बांगर व बाळा बांगर पिता-पुत्राविरोधात गुन्हा
रोखठोक न्युज वार्ताहर
पाटोदा तालुका दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था, दूध उत्पादक व पुरवठा संघ मर्यादित पाटोदा जिल्हा बीडचे पदाधिकारी रामकृष्ण मारोतराव बांगर व विजयसिंह उर्फ बाळा रामकृष्ण बांगर यांच्या विरोधात एक कोटी ६९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. त्यावरून परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिस ठाण्यात २९ सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळीचे सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक कराड यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
परळी येथील सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक कराड यांचा रामकृष्ण बांगर व विजयसिंह बांगर या बापलेकांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर पाटोदा तालुका दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था अंतर्गत दूध उत्पादक व पुरवठा संघ मर्यादित पाटोदा सहकारी संस्था आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले व बांगर पिता- पुत्रांनी वाल्मीक कराड यांना वारंवार पैशांची मागणी केली. २८ जून २०२३ रोजी श्री गणेश कन्स्ट्रक्शन वरून एक कोटी ६९ लाख ७५ हजार ३३५ रुपये ट्रान्सफर करून एका मल्टीस्टेटच्या सिरसाळा येथील शाखेत खात्यावर घेतले. त्यानंतर वाल्मीक कराड हे रामकृष्ण बांगर यांना व विजयसिंह बांगर यांना दिलेले पैसे परत मागण्यास गेले. परंतु त्यांना पैसे काही परत दिले नाही. उलट पैसे परत मागितल्यास जिवे मारण्याची धमकी बांगर पिता- पुत्रांनी वाल्मीक कराड यांना दिली. तसेच चिठ्ठी लिहून आत्महत्या करू व राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू, अशी धमकी दिली आहे. वाल्मीक कराड यांना दिलेले पैसे परत न करता त्यांचा विश्वासघात वफसवणूक करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशा फिर्यादीवरून सिरसाळा पोलिस ठाण्यात रामकृष्ण बांगर व विजयसिंह बांगर यांच्या विरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामकृष्ण बांगरविरोधात दुसरा गुन्हा
रामकृष्ण बांगर यांची सहकार महर्षी म्हणून जिल्हाभरात ओळख आहे. परंतु दोन आठवड्यात त्यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
■ या अगोदरही त्यांनी पाटोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची ८१ आर जमीन ही नातेवाइकांच्या नावे केली होती. त्यांच्याविरोधात पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
■ हे प्रकरण ताजे असतानाच आता बांगर पिता-पुत्राविरोधात सिरसाळ्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
रामकृष्ण बांगर व विजयसिंह
रामकृष्ण बांगर (रा. पाटोदा) या दोघांविरोधात रविवारी एक कोटी ६९ लाख ७५ हजार ३३५ रुपयांच्या फसवणूकप्रकरणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार आल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीना अटक करण्यात आलेली नाही.
– गोरखनाथ दहिफळे, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे सिरसाळा
