• Thu. Jun 4th, 2026

आठ दिवसांत सर्व पुराव्यासह आमदार नमिताताई मुंदडा व संबंधित अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार;मा.आमदार पृथ्वीराज साठे

Bybaba maske

Oct 3, 2024

आठ दिवसांत सर्व पुराव्यासह आमदार नमिताताई मुंदडा व संबंधित अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार;मा.आमदार पृथ्वीराज साठे

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज च्या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांसमोर वार्तालाप करताना केज मतरसंघात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची माहिती येत्या आठ दिवसात पत्रकार परिषदे घेऊन संबंधित अधिकारी व आमदार नमिताताई मुंदडा यांची पोलखोल करणार असल्याच सांगितल.

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी औपचारिक पत्रकार बरोबर गप्पा मारताना सांगितल की केज व अंबाजोगाई शहर तसेच ग्रामीण भागात रस्ते, नाली यात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून एकाच रस्त्यावर दोन दोन योजनेंतर्गत निधी दिला तसेच कुठे रस्ता न करताच त्याचे बील उचलले गेले आहेत.नगरोत्थान असो डिपीडिसी असो,आमदार निधी असो प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाला असून त्याला संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सुद्धा साथ दिली आहे.

ज्यावेळेस या भ्रष्टाचार संबंधित माहिती गोळा करण्याची प्रयत्न केले तर या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून माहिती देण्यास असहकार्य केले तसेच माहिती देण्यास एकतर टाळाटाळ केली किंवा विलंब लावला असा आरोप त्यांनी अधिकाऱ्यांवर लावला.

मतदार संघातील शहर असो की तालुके प्रत्येक रस्ता नाली चे कामे आपल्या संबंधित गुत्तेदार व त्यांच्या एजन्सीकडून काम करून घेतले व प्रचंड माया कमावले असा ही आरोप माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आमदार नमिताताई मुंदडा यांच्यावर लावला तसेच याची सर्व पोलखोल येत्या आठ दिवसात पत्रकार परिषदेत करणार असल्याच सांगितल.तर राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते तथा विधानसभा अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितल की राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे यांनाच उमेदवारी भेटणार असून तशी आम्ही सर्व नेत्यांना घेऊन निवडून आणण्याची तयारी करत आहोत.येणाऱ्या काळात केज मतरसंघातून आमदार म्हणून पृथ्वीराज साठे हेच दिसतील असे ही ते म्हणाले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!