खासदार बंजरग सोनवणे यांनी पत्रकारला संरक्षण देण्यासाठी दिले पोलीसांना पत्र !
भाजप समर्थक देत होते जिवे मारण्याच्या धमक्या?

रोखठोक न्युज वार्ताहर
दै.पुण्यभुमीचे तालुका प्रतिनीधी यांना काही दिवसांपासून वेगवगळ्या फोन नंबर वरून फोन करून धमक्या देण्यात येत होत्या. रोहन गंलाडे यांनी चिंचोली माळी येथील नामदेव महाराज यांच्या समाधी साठी उपोषण केले होते तसेच पत्रकारी करताना आपल्या दैनिकात विद्यामान आमदारा विरोधात व त्यांच्या भष्टाचारा विरोधात लिखाण करत होते त्याचाच राग मनात धरून त्यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमक्या येत होत्या यांची तक्रार त्यानी पोलीस ठाण्यात नोंद केली होती तसेच खासदार बजरंग सोनवणे यांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन तात्कळ रोहन गंलाडे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे म्हणून पत्र दिले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्र देऊन खऱ्या अर्थाने चौथ्या स्तंभाच संरक्षण केल्याची भावना प्रत्येक पत्रकाराची भावना झाली आहे.
