वारसांची नावे लपवून न्यायालयाची फसवणूक, नगरसेविकेसह पतीवर गुन्हा
रोखठोक न्युज वार्ताहर
केज नगरपंचायतीच्या नगरसेविकेने पदाचा गैरवापर करत, मृत सासूच्या इतर वारसांची नावे लपवून, पती व स्वतः असे दोघेच वारस असल्याचे प्रमाणपत्र नगरपंचायतींकडून मिळवले. या प्रमाणपत्राअधारे वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र जोडून न्यायालयाची फसवणूक केली. याप्रकरणी नगरसेविका पल्लवी रांजणकर व त्यांचे पती ओमप्रकाश रांजणकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेविका पल्लवी ओमप्रकाश रांजणकर यांच्या सासू विमलबाई
रांजणकर यांचे १९ जुलै २०२२ रोजी निधन झाले. विमलबाई यांना पाच मुले होती. त्यापैकी मंगेश रांजणक रांजणकर, अनिल रांजणकर व ओमप्रकाश रांजणकर हे हयात आहेत. मेघराज रांजणकर व सतीश रांजणकर हे मृत आहेत. नगरसेविका पल्लवी रांजणकर यांनी स्थावर व जंगम मिळकतीवर वारसांचे नाव लावण्यासाठी पदाचा गैरवापर केला. त्यावरून नगरसेविका पल्लवी रांजणकर व ओमप्रकाश रांजणकर या दोघांविरूद्ध केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन करत आहेत.
दिराने दिली तक्रार
विमलबाई यांचे वारस ओमप्रकाश रांजणकर व सून म्हणून स्वतः हे दोघेच वारस असल्याचे प्रमाणपत्र, नगरसेविका रांजणकर यांनी नगरपंचायतींकडून मिळवले. इतर वारसांची नावे लपवून पती व स्वतःचे खोटे प्रतिज्ञापत्र जोडले. तसेच न्यायालयाकडे वारस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी २५ ऑगस्ट २०२२ रोजी अर्ज दाखल केला आहे. या दांपत्यानेन्यायालयाचीप पत्याने न्यायालयाची फसवणूक केल्याची तक्रार, नगरसेविका पल्लवी रांजणकर यांचे दीर मंगेश रांजणकर यांनी दिली.
