केज शहराला पुन्हा अतिक्रमणाचा विळखा. नागरिकांचे चालणे ही झाले मुश्किल.
तहसीलदार राकेश गिड्डे व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी लक्ष देण्याची गरज.
ट्रॅफिक पोलिस पोलीस ठाण्याच्या बाहेर निघेना?पोलीस ठाण्या समोर बॅरेकेटस लावून वाहनाची अडवूनक!
तहसील कार्यालयासमोर अतिक्रमण काढल जात तर मग,केज शहरातील का नाही?

रोखठोक न्युज वार्ताहर
गेल्या पाच सहा महिन्या पुर्वी प्रशासनाने मनावर घेऊन केज शहरातील अतिक्रमण काढले होते संपुर्ण शहराने त्या वेळेस मोकळा श्वास घेतला होता.केजचे तत्कालीन तहसीलदार अभिजित जगताप व पोलीस उपधिक्षक पंकज कुमावत यांनी स्व:ता जातीने लक्ष देऊन केज शहर अतिक्रमण मुक्त केले होते.त्याच्यात नगरपंचायत ने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी तो धुडकावून लावत सगळे अतिक्रमण उठवले होते.
पण सध्या पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले आहे.त्या कडे प्रशासन डोळे झाक करत असल्याने केज शहर व तालुक्यातील शहरात येणाऱ्या लोकांचे चलने मुश्किल झाले आहे.
फलोत्पादनाच्या(जिरायतखाते) जागेतील अतिक्रमण काढले की तेथील टपरी धारक पुन्हा पुन्हा अतिक्रमण करतात व पहिल्या पेक्षा मोठी जागा धरतात व पत्र्याचे मोठ मोठे गाळे करतात तर एका बाजूस फळ विक्रेत्याकडून( बागवान) मंडळींकडून ऐन रस्त्यावर फळाचे गाडे लावल्या मुळे पुर्ण महामार्ग वर अडथळे निर्माण झाले आहेत त्यातच दिपावली सारखा मोठा सण जवळ आल्याने खरेदी साठी लोक घराच्या बाहेर पडत आहेत त्या मुळे चारचाकी, दोनचाकी रस्त्यावर उभे असल्याने चालने मुश्किल झाले आहे तसेच प्रवासी वाहने, मालवाहतूक वाहन चालवने मुश्किल झाले आहे तर रस्त्याच्या कडेने तयार झालेल्या टपऱ्या वर उभे राहून टवाळखोर मुले मुलीना छेडणे अश्लील टिप्पणी करणे असे प्रकार चालू आहेत. त्यातच रस्त्यावर वाहतूकीचे नियोजन करण्या साठी ट्राफिक पोलीसांची गरज असताना एक पोलीस कर्मचारी रस्त्यावर दिसत नाहीत.
पोलीस स्टेशन च्या समोर ट्राफिक पोलीस बॅरेकेटस लावून तिथेच चलन फाडणे.गाड्या आडवण्याचे कामे करतात पण जिथे गर्दी आहे जास्त प्रमाणात रहदारी आहे तिथे पोलीस कधीच दिसत नाही.पोलीस ठाणे ते पोलीस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर येवढ्याच जागेत ट्राफिक पोलीस दिसताता.
तरी आता केज मधील अतिक्रमण पुन्हा एकदा खंबीर होऊन प्रशासनाने काढावे.निवडणूकीच्या अनुशंगाने तहसील समोरील अतिक्रमण निघत असेल तर मग संपुर्ण केज शहरातील व मुख्य महामार्गावरील अतिक्रमण का निघत नाही? आता या काळात प्रशासनाला पोलीस फोर्स मागवायची गरज नाही कारण निवडणुकी साठी बीएसएफ चे जवान केज मध्ये बंदोबस्ता साठी आले आहेत.फक्त प्रशासनाने मनावर घेणे गरजेच आहे.
असे आता नागरिक चर्चा करत आहेत. पुन्हा एकदा केज शहरातील अतिक्रमण काढून मोकळा श्वास घेण्या साठी प्रशासनाकडून कडक कारवाई करावी अशी मागनी तालुक्यातील जनता करत आहे.
