केज विधानसभा मतदारसंघातून संगिता ठोंबरे निवडणूक लढण्यावर ठाम
रोखठोक न्युज वार्ताहर
केज विधानसभा मतदार संघात उमेदवार अर्ज भरण्याची प्रतिक्रिया सुरू झाली असून येत्या दि.२९ ऑक्टोंबर २०२४ रोजी पर्यत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
माजी.आ. प्रा.संगिता ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती.त्याठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने माजी.आ.प्रा.संगिता ठोंबरे यांनी मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आता केज मतदार संघाच्या विकासासाठी तसेच सामान्य माणसाच्या भविष्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार माजी.आ.प्रा.संगिता ठोंबरे यांनी केला आहे.त्या अनुषंगान प्रा.ठोंबरे यांनी निवडणूक लढण्याची संपूर्ण प्रतिक्रिया केली असून,येत्या सोमवार दि.२८ ऑक्टोंबर २०२४ रोजीचा मुहूर्त साधण्याचा पर्यत आहे.परंतु माजी.आ.प्रा. संगिता ठोंबरे या निवडणूक लढवण्यावर ठाम असून ठोंबरे यांनी केलेली विकासकाम तसेच सहकारी समर्थक व कार्यकर्त्यांचा बळावर विजयी पल्ला गाठू असा आत्मविश्वास मा. आ.संगिता ठोंबरे यांनी वक्त केला आहे.
केज विधानसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढतीचं चित्र आहे.प्रामुख्याने महायुतीकडून आ.नमिता मुंदडा,महाविकास आघाडीकडून मा.आ.पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मा.आ.सगीता ठोंबरे या इच्छुक होत्या.कारण त्याच्याकडे एलेक्टिव्ह मिरीट होत.माजी आमदार म्हणून त्यांनी मतदार संघाच्या विकासासाठी महत्वपूर्वक भूमिका घेतलेली होती.सन २०२४ ते २०१९ या पाच वर्षांचा कार्यकाळात प्रा.संगीता ठोंबरे यांनी आमदार म्हणून काम केलं होतं.परंतु पक्ष नेतुत्वाच्या आदेशानुसार त्यांनी सन २०१९ ची निवडणूक लढवली नाही.त्यांना थांबण्याचा आदेश दिलेला होता.मात्र नंतर काळात माजी आमदार प्रा.संगीता ठोंबरे यांची पक्षामध्ये होत असलेली घुसमट आणि उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यामुळ मा.आ.संगीता ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मागणी केली.परंतु त्या ठिकाणी मा.आ. पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी गेल्यानं ही संधी हुकली होती.मात्र माजी.आ.संगीता ठोंबरे यांना पक्षांन उमेदवारी थांबवली होती.मात्र उमेदवारांन त्यानं नाकारलं नव्हतं म्हणून मतदार हे आपलं न्यायालय असून त्यांच्या आदेशानंतर व त्यांच्या जनमतानंतर आपला काय तो निर्णय असेल अस माजी.आ.संगीता ठोंबरे यांनी स्पष्ट केलं.त्यावरून मतदारानी मला नाकारलेलं नाही म्हणून त्यांच्या विश्वासावर उद्याची निवडणूक लढवण्याचा निश्चिय माजी.आ.संगीता ठोंबरे यांनी केला आहे.त्याअनुषंगान येत्या सोमवार दि.२८ ऑक्टोंबर २०२४ रोजीचा माजी.आ.संगीता ठोंबरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच समजलं जातं आहे.एकूणच
माजी.आ.ठोंबरे यांच्या उमेदवारीनं केज मतदार संघात तिरंगी लढतीचे चित्र आहे.
