• Wed. Apr 29th, 2026

शेवटी कासवाने आर्धी शर्यत जिंकली..केज राशप कडून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी. भावनेच्या लाटेत साठेची नया पार होणार? चौरंगी लढत होण्याची शक्यता!

Bybaba maske

Oct 25, 2024

शेवटी कासवाने आर्धी शर्यत जिंकली..केज राशप कडून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी.
भावनेच्या लाटेत साठेची नया पार होणार?
चौरंगी लढत होण्याची शक्यता!
रोखठोक न्युज वार्ताहर
केज मतरसंघात अखेर राष्ट्रवादीकडून (शरदपवारगटाकडून) माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर झाली.राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्या वेळेस अजित पवार गट वेगळा झाला आणि काही मोजकेच लोक शरदपवार गटा सोबत राहीले त्यात पृथ्वीराज साठे यांचा वरचा क्रमांक राहीला.
त्यानंतर लोकसभेत शरदपवार गटाने चांगल्या स्ट्राईक रेट ने वापसी केली त्या वेळेस शरदपवार गटात येण्या साठी नेत्याची रांगा लागल्या व उमेदवारी मिळवण्या साठी केज मतरसंघात मोठी चढाओढ लागली होती अश्यात ही पृथ्वीराज साठे आपल्या उमेदवारीवर अश्वसत होते व शांत होते आज खऱ्या अर्थाने त्यांना उमेदवारी भेटल्यावर ते भावूक झाले. स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर एक नगरसेवक असलेले पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी भेटली व ते निवडून ही आले त्यांना जेमतेम अडीच वर्षाचा काळ भेटला पण त्यांनी ऐवढ्याच वेळात मतदासंघा साठी भरपूर निधी आणला व आपले कर्तव्य सिद्ध केले होते.अंत्यत मनमिळाऊ व आर्थिक दृष्ट्या गरीब पण मतदारा विषयी तळमळ असलेला नेता म्हणून मतदारसंघात ओळख आहे.आता ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली असे वाटते.

पण खरी लढाई आता कुठे सुरुवात झाली आहे.कारण कित्येक उन्हाळे पावसाळे व राजकीय डावपेच आखलेला पैलवान समोर आहे त्यातच माजी आमदार संगिताताई ठोंबरे व अंजलीताई घाडगे या दोघीही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.तर राखीव मतदारसंघ असल्याने वंचित बहुजन आघाडीची ही निर्णायक भुमीका रहाणार आहे यातून पृथ्वीराज साठे कसा मार्ग काढतात ते येणारा काळच ठरवेल.तूर्तास ऐवढे, बाकी पुढील भागात.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!