परळी मध्ये धनंजय मुंडे विरोधात राजेसाहेब देशमुख तर माजलगावात प्रकाश सोळंके विरोधात मोहन जगताप यांना उमेदवारी.
रमेश आडसकर यांचा पत्ता कट!! रमेश आडसकर काय निर्णय घेणार?
दोन्ही उमेदवारी मध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचा वाटा?
रोखठोक न्युज
विधानसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आज परळी व माजलगाव येथील उमेदवार जाहीर करण्यात आले त्यात परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटा तर्फे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली होती त्यांच्या विरोधात कोण उमेदवार देईल याच्या चर्चा मतदारसंघातून चालू होत्या त्यात रोज एक नाव येत होते पण शेवटी जिल्हा परिषद चे माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी भेटली आहे.परळीत आता वंजारी(ओबीसी) विरोधात मराठा असा सामना होईल. कारण राजेसाहेब देशमुख हे मनोज जरांगे-पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.
तर ईकडे अजित पवार गटाकडून राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदार प्रकाश सोळंके यांना बोहल्यावर चढवले होते त्याच्या विरोधात कोण उमेदवार येईल ते आता उघड झाले असून छत्रपती सहकारी साखर कारखाण्याचे चेअरमन मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.दोन दिवसांपुर्वीच भाजप नेते व प्रकाश सोळंके यांचे 2019 चे प्रतिस्पर्धी राहिलेले रमेश आडसकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल असे असताना आज त्यांना उमेदवारी न देता मोहन जगताप यांना उमेदवारी दिली.आता रमेश आडसकर काय निर्णय घेतात त्याकडे सगळ्यांच लक्ष असेल.
या दोन्ही उमेदवारी देण्यात बीड चे खासदार बंजरग सोनवणे यांचा खूप मोठा वाटा असल्याच समजते त्यांनीच हे दोन नावे पक्ष श्रेष्ठी कडे लावून धरले होते
