डोक्यात दगड घालून खून
रोखठोक न्युज वार्ताहर
तालुक्यातील डोंगर पिपळा येथे 35 वर्षे तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे एकच खळबळ माजली आहे सणासुदीच्या दिवसांमध्ये ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सचिन शिवाजी तिडके वय पस्तीस रा. भोगलवाडी हल्ली मुक्काम डोंगरपिंपळा ता अंबाजोगाई जी.बीड येथील रहिवासी व डोंगर पिंपळा गावचा जावई असून
एक वर्षापासून सासरवाडीत डोंगर पिंपळा येथे पत्नी मुलांसोबत राहत असत. रात्री पासुन सचिन तिडके बेपत्ता होता.
आज दुपारी एक वाजता त्याचा मृतदेह डोंगर पिंपळा शिवारात चेहऱ्यावर दगड मारुन चेंदामेंदा केलेल्या अवस्थेतआढळून
आला. घटनास्थळी दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय घुगे व पोलीस कॉन्स्टेबल भागवत यांनी घटनास्थळी धाव घेत सचिन याचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया उद्या सकाळी होणार असुन सदरील खून हा सासरवाडीतील लोकांनीच घडवून आणला असल्याचे सचिनच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे कारण ते मृतदेहाजवळ गेले असता सासरवाडीकडील लोकांनीमयताच्या नातेवाईकांना शिवीगाळ व अंगावर दगड घेऊन धावले असल्याचे सांगत आहेत.
सचिन याच्या पश्चात दोन मुले,पत्नी आईवडील भाऊ भावजय असा परिवार आहे.
ऐन दिवाळीत आनंद उत्सव साजरा होत असताना तिडके कुटुंबीयावर शोक करण्याची वेळ आली असून त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
