• Wed. Apr 29th, 2026

*केज शहरातील व्यापारी बांधवा सोबत नमिता मुंदडा यांच्या संवाद दौऱ्याला मोठा प्रतिसाद*

Bybaba maske

Nov 1, 2024

*केज शहरातील व्यापारी बांधवा सोबत नमिता मुंदडा यांच्या संवाद दौऱ्याला मोठा प्रतिसाद*

रोखठोक न्युज वार्ताहर

दिवाळी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केज शहरातील भवानी चौक, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, मेन रोड, सराफ लाईन, टेलर गल्ली, कानडी रोड येथे प्रत्यक्ष जाऊन केज मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता मुंदडा यांनी प्रत्येक व्यापारी बांधवांसोबत संवाद साधला.

तसेच सर्व नागरिक व व्यापाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा प्रदान केल्या. सोबतच येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत असे नम्र आवाहन आ.नमिता मुंदडा यांनी केले.

यावेळी केज शहरातील नागरिक व्यावसायिक आणि व्यापारी आदी बांधवांशी विकास कामांच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा केली. भेटीदरम्यान व्यापारी बांधवांकडून ठिकाठिकाणी आ.नमिता मुंदडा यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी आ.नमिताम मुंदडा यांच्या सोबत नेताजी पापा शिंदे, सुनिल आबा गलांडे,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सुर्यवंशी, सचिव सुहास चिद्रवार,केज तालुका भाजप अध्यक्ष भगवान केदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ.वसुदेव नेहरकर, अतुल इंगळे, खदिर कुरेशी, प्रकाश मुंडे,शिवाजीराव पाटील,संजय गुंड, मुबीन भाई,रफिक इनामदार, जैनु काझी,मुन्ना शिंदे,संतोष जाधव, दस्तगीर भाई, डॉक्टर पवार, शिवाजी जाधव, दत्ता सावंत,विकास जाधव,अर्जुन बनसोडे तसेच अनेक व्यापारी बांधव, मतदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!