• Wed. Apr 29th, 2026

माजी आमदार संगीता ठोंबरे शरद पवार गटात आल्या पण कार्यकरते भाजपात राहिले! नमिता मुंदडा यांनाच फायदा होणार

Bybaba maske

Nov 10, 2024

माजी आमदार संगीता ठोंबरे शरद पवार गटात आल्या पण कार्यकरते भाजपात राहिले!

नमिता मुंदडा यांनाच फायदा होणार

रोखठोक न्युज वार्ताहर

माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभेच्या निवडणुकीतुन‌ अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिला व नंतर दोन दिवसानी पक्षात प्रवेश केला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांना पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष पद दिले पण सध्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे कार्यकर्ते कुठे गेले अशी चर्चा होत आहे
माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे केज अंबाजोगाई येथील जवळ पास सगळेच कार्यकर्ते नमिता मुंदडा यांच्या सोबत जाताना दिसत आहेत कारण संगीता ठोंबरे यांच्या बरोबर जे कार्यकर्ते होते ते जवळपास सर्वच भाजपचे विचारसरणीचे होते संगीता ठोंबरे यांच्यासोबत परंतु आत्ता संगीता ठोंबरे यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची चांगलीच पंचायत झाली होती ती जवळपास आता सगळेच कार्यकर्ते नमिता मुंदडा यांच्यासोबतच दिसत आहेत
माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिलेल्याचा काय फायदा होणार?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
फक्त माजी आमदार संगीता ठोंबरे या पृथ्वीराज साठे बरोबर सगळे कार्यकर्ते मुंदडा बरोबर या मुळे या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्याचा फायदा फक्त नमिता मुंदडा यांनाच होताना दिसत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!