नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ आयोजीत लोकनेत्या.मा.आ. पंकजाताई मुंडे यांच्या जाहिर सभेला लोटला जनतेचा अथांग जनसमुदाय.
मी उमेदवार आहे असे समजून नमिता मुंदडा यांना निवडून आणा!!
माझी जनता माझा श्वास आहे, माझा चेहरा आठवून कमळाच्या फुलाला प्रचंड बहुमताने विजयी करा – लोकनेत्या.आ. पंकजाताई मुंडे
लोकनेत्य.आ.पंकजाताईंना मंत्री मंडळात पाहण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी नमिताताई मुंदडा यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या – मा.खा.प्रितम ताई मुंडे.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज विधानसभेची निवडणुक रोमांचक वळणावर असून भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेद्वार नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ आयोजीत जाहिर सभेस केज मतदार संघातील जनतेचा अथांग जनसमुदाय जमला होता. आणि या जनसमुदायाला संबोधीत करतांना
लोकनेत्या. आ.पंकजाताई म्हणाल्या कि,
बरडावरची सभा हि विजयाची सभा असून मी असे अवाहन करते कि माझी जनता हि माझा श्वास आहे, मला तुमच्यावर विश्वास आहे,केज मतदार संघात तगडी फाईट आहे, फार्म भरून कांही लोक माघारी फार्म घेवून आले पण तिकीट नाही भेटले, मुंडे साहेबांच कमळ, पंकजा ताईंच कमळ आहे नमीता उमेद्वार असली तरी तिच्या मागे आ.पंकजाताई आहे, पराभव जिव्हारी लागला असला तरी मला जनतेच्या विश्वासाच्या जिवावर नमिताला निवडून आणायचं आहे, जिंकायचं आहे,मागच्या सगळ्या चुका बाजूला ठेवून सर्वांनी कामाला लागायचं आहे, मी स्वतः लक्ष देईन, मी माझ्या सामान्य जनतेची कामे स्वतः करणार असून तुमच्या प्रेमामुळे मी विधान परिषदेवर आहे, माझा चेहरा समोर आठवून मतदान कमळाच्या फुलाला बहुमताने मतदान करा, अभिमानाने काम करण्यासाठी, जागरूकतेने, जवाबदारीने मतदार संघाची कामे करून घेण्यासाठी, तुम्ही सर्व जण मतदान रुपी आशिर्वाद द्या, आणि येत्या २० तारखेला कमळाचे बटन दाबून नमिता मुंदडाला निवडून द्या.
मा.खा.प्रीतमताई मुंडे……
पंकजाताईंना मंत्री मंडळात पाहण्यासाठी येत्या २०. तारखेला कमळाचे बटन दाबून नमिता मुंदडा यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे, स्व. लोकनेते. गोपीनाथ मुंडे साहेबांची प्रतिमा आपण ज्यांच्यात पहातो अशा पंकजाताईंना मंत्री करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आणि प्रचंड बहुमताने नमीता मुंदडांना निवडून द्यायचे आहे यावेळी नांदूर, विडा, चिंचोली, नेकनूर, येवता जिल्हा परिषद सर्कल गटातील सर्व जनता उपस्थित होती पुढे बोलताना मा.खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले कि, मी माजी खासदार नसून माझी खारदार असून मी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची लेक आहे गेली पाच वर्षे मुंदडा कुटुंबाने मतदार संघात चांगली उत्कृष्ट कामे केली आहेत मी डॉक्टर असल्यामुळे जनतेची नाडी चांगली ओळखते, महायुतीचे सरकार आणायचे तर कमळाच्या फुलाला उचलून धरा, हजारो, लाखोंची गरज आहे आपणास आ.पंकजाताईंना मंत्रीमंडळा त पहायचे आहे त्यामुळे, तसेच बीड जिल्ह्याच्या विकासाला लागले ला ब्रेक काढण्यासाठी नमीता ताईंना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे अवाहन त्यांनी केले.
अक्षय मुंदडा….
आमच्या घराला गुलाल लावण्याचे काम आ.पंकजाताईंनी केले, आज पंकजाताई मंत्री मंडळात, सभागृहात हव्या आहेत विरोधकांचा खरपूस समाचार घेत त्यांनी सांगितले कि आज राजकारणात कांहीं लोकांनी फार खालची पातळी धरली आहे, दिल्ली फिरायला तीन महिने लागतील आणि यांनी रेल्वे तीस दिवसात तीस कि.मी. आणली असे सांगतात, ज्या व्यक्तीला सोलापूर आणि कुर्डूवाडी चा फरक कळत नाही, राक्षसी प्रवृती आमची नाही कोणाची हे जनतेला चांगलेच माहित आहे, परंतु आम्ही चोर नक्कीच नाहीत, विरोधाकावर टिका करताना कांही लोकांनी राजकारणाची पातळी खालच्या लेवलवर आणली, धोका देणं आमच्या स्वभावात नाही, ज्यांच्या मनात धोका देण्याची प्रवृत्ती आहे ते जनतेला का धोका देणार नाही ? कोणाची छाती फाडल्यावर कोण दिसते हे सर्वांना माहित आहे, ज्या शेतकऱ्यांचे उस तुम्ही शेतातच जाळले त्यांना तुम्ही काय न्याय देणार ? नेता अधिकार देणारा, जबाबदारी घेणारा असावा, पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि केजमध्ये ज्यांना नगर पंचायत चा सी.ओ संभाळता आला नाही अशांना ७५, कोटीचा निधी केज नगर पंचायत ला दिला, भविष्यात विशेष लक्ष या मतदार संघावर देणार, आपण केज मतदार संघाचा विकास करण्यासाठी कमळाच्या फुलाला निवडून द्यावे अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीनंतर १०००० कोटी च्या कामाचे उद्घाटन मा. आ.पंकजाताई यांच्या हस्ते होईल.
नमिता ताई मुंदडा…
सुरुवातीचा कांही काळ कोरोनामुळे मी खचले असताना, तरीही दवाखान्या मध्ये जावून कोरोना ग्रस्ताची विचापूस केली,डॉक्टरांना चांगल्या उपचारासाठी अवाहन केले, मतदार संघात दोन हजार कोटीची कामे केज मतदार संघात आणली, दोन एम. आय. डी.सी आणल्या आहेत, तीर्थक्षेत्र विकासासाठी भरघोष निधी दिला, काम करत असताना मला ताईंची कमतरता भासत होती परंतु तो प्रश्न सुटला आहे, राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी मला बहुमताने निवडून द्या मी अशी विनंती करते कि मंत्रीमंडळाचा पहिला शपथविधी पंकजाताईंचा असेल. या सभेला अथांग जनसागर उसळला होता नमिता मुंदडा यांचा विजय दृष्टीक्षेपात दिसून येत होता नव्हे तर विजय निश्चित च होणार या त शंका नाही असे जनतेतून बोलले जात आहे.
यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकारी,भाजपाचे जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर ( काकाजी ) मुंदडा, विक्रम ( बप्पा ) मुंडे, शालीनी ताई कराड, रमाकांत मुंडे,सखाहरी( तात्या ) गदळे, राम कुलकर्णी, भगवान केदार, विजय कांत मुंडे,संतोष हंगे, डॉ. वासुदेव नेहरकर, महादेव सुर्यवंशी,विष्णू चाटे, विष्णू घुले, पंजाबराव देशमुख, राहूल गदळे, सुनिल घोळवे, संदीप पाटील, तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
