• Thu. Jun 25th, 2026

आमदार नमिता मुंदडा यांचे पारडे जड!! अंतर्गत कुरबूर संपल्याने एकजुटीने प्रचार चालू. सगळे गाव मामाचे पण एक नाही कामाचा अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची 

Bybaba maske

Nov 18, 2024

आमदार नमिता मुंदडा यांचे पारडे जड!!

अंतर्गत कुरबूर संपल्याने एकजुटीने प्रचार चालू.

सगळे गाव मामाचे पण एक नाही कामाचा अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज विधानसभेत आमदार नमिता मुंदडा यांचे सर्व विरोधक एकवटल्याने कुठे तरी पिछाडीवर असलेले भाजप उमेदवार नमिताताई आता आघाडीवर दिसत आहेत.

आमदार पंकजा मुंडे यांनी भाजप मध्ये नाराज असलेला एक गट यांना बोलवून समजून सांगितले व तुम्हाला नमिताताई यांचे काम करण्याचे सांगितले त्या मुळे नाराज गट आता प्रचारात पुर्ण पणे एकवटला आहे.तसेच एकीकडे विरोधकांनी सर्वच नेते एकत्रित असल्याने मानसन्मान याच्या वरून नाराजी दिसत आहे.कालच एक भावी उमेदवार ज्यांनी पाठींबा दिला होता ते मुंबई ला निघून गेला तर दुसरी कडे सर्व नेतेच नेते झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे.नेमकी प्रचाराची दिशा ठरत नसल्याने फक्त मोठ मोठे पक्ष प्रवेश होत आहे.प्रचारा साठी लागणारी आर्थिक यंत्रणा कुठेच दिसत नाही.जो तो पैश्या साठी एकमेका कडे बोट दाखवत आहेत.पक्ष निधी व खर्च करण्या साठी सांगितलेला मोठा नेता सर्व निधी व पैसा स्वतःच्या मांडीखाली घेऊन बसल्याने राशपची शरद पवार गटाची आर्थिक यंत्रणा कुठेच दिसत नसल्याने यंत्रणा कोलमडून पडली आहे.पत्रकार पृथ्वीराज साठे यांची प्रसिद्धी करत नाही.सोशल नेटवर्किंग, मिडीया ऐवढी ताकदवान असताना अख्या निवडणुकीत त्यांना डावल गेले आहे तीच गत कार्यकर्त्याची झाली आहे. लोकसभे सारखाच या वेळेस जंरागे फॅक्टर काम करेल असे वाटत असताना.भाजप न आपली व्यवस्थापनाने यंत्रणा बळकट केली आहे त्या मुळेच सोशल मीडियावर, कार्यकर्ते ताकदीने भाजपचा प्रचार करत आहे.त्यामुळेच सद्या तरी नमिताताई मुंदडा यांचे पारडे मतदारसंघात जड दिसून येत आहे.सगळे गाव मामाचे पण एक नाही कामाचा अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची झाली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!