• Fri. Apr 24th, 2026

केज नगरपंचायत तर्फे शहरात स्वच्छता पंधरवाडा राबवला जात असताना,नगरपंचायत कर्मचाऱ्याचे जिव धोक्यात टाकले!! स्वच्छता कर्मचाऱ्यांना कुठलेच सुरक्षा किट न देताच नाली सफाईच्या काम करायला लावले. स्वच्छता कर्मचाऱ्यांत कोणाला संसर्ग झालातर जिमेद्दार कोण?

Bybaba maske

Dec 8, 2024

केज नगरपंचायत तर्फे शहरात स्वच्छता पंधरवाडा राबवला जात असताना,नगरपंचायत कर्मचाऱ्याचे जिव धोक्यात टाकले!!

स्वच्छता कर्मचाऱ्यांना कुठलेच सुरक्षा किट न देताच नाली सफाईच्या काम करायला लावले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांत कोणाला संसर्ग झालातर जिमेद्दार कोण?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात नगरपंचायत तर्फे स्वच्छता पंधरवडा काल पासुन चालू झाला आहे,यात शहरातील नाली,रस्त्याची साफसफाई चालू केली आहे.केज नगरपंचायत चे सत्ताधारी कुठलेही इव्हेंट करायला अग्रेसर असतात त्यात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असतो पण यात आपल्याच नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आणली जात आहे.केज शहरात दलित नगराध्यक्ष असताना व स्वतःला मुस्लिम,दलितांचा मसीहा समजणार्‍या ला दलित, मुस्लिम सफाई कामगाराची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे.स्वतःचा व नगराध्यक्ष चा इव्हेंट करण्याच्या नादात केज शहरातील घाणेरडी नाली, रस्ते, दलित मुस्लिम सफाई कामगारा कडून साफसफाई करून घेतली पण त्यांची सुरक्षेची कुठलीच तजवीज ठेवली नाही.

कुठल्याच सफाई कामगारांना सुरक्षा किट तर दिलीच नाही तर साधे ग्लोज(हातात घालायचे)किंवा गम बुट दिले नाहीत, जर उद्या कुठला संसर्ग झाला तर यास जिमेद्दार कोण असा प्रश्न आता सर्व सामान्य विचारत आहेत.का सफाई कामगारांचा जिव ऐवढा सस्त झाला आहे असा प्रश्न आता शहरात विचारला जात आहे.स्वतः सत्ताधाऱ्यांचे फोटो काढण्या साठी गोरगरीब सफाई कामगारांचे जिव धोक्यात घालण्याचे हक्क या सत्ताधारी नगराध्यक्षाला व मुख्याधिकारी यांना कोण दिला? किंवा सफाई कामगारा साठी सुरक्षा किट चा निधी कोणी खाल्ला याची चौकशी होयला पाहीजे अशी भूमिका सर्व सामान्य नागरिक करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!