उद्या टाकळीत लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन-सूरज घुले
रोखठोक न्युज प्रतिनिधी
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त टाकळी (ता.केज) येथे सोमवारी (दि.९) सकाळी १० वाजता आळंदी (देवाची) येथील ह.भ.प.आदिनाथ महाराज लाड यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे.अशी माहिती युवानेते सुरज रामकृष्ण घुले यांनी दिली.
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची ७५ वी जयंती समाजप्रबोधनपर कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचा निर्णय युवानेते सुरज रामकृष्ण घुले यांनी घेऊन टाकळी येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात सोमवारी सकाळी ११ वाजता आळंदी (देवाची) येथील ह.भ.प. आदिनाथ महाराज लाड यांचे कीर्तन आयोजित केले आहे.कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा.असे आवाहन युवानेते सुरज रामकृष्ण घुले यांनी केले आहे.
