• Wed. Apr 29th, 2026

मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील तिसऱ्या आरोपीस पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात

Bybaba maske

Dec 11, 2024

मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील तिसऱ्या आरोपीस पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज – जिल्हा हादरवून सोडणाऱ्या मस्साजोग खून प्रकरण तपासात पोलिसांनी आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीस बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात बेड्या ठोकल्या. प्रतिक भीमराव घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

खून केल्यानंतर प्रतिक घुले पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी यापूर्वी जयराम माणिक चाटे (वय २१ रा. तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय २१ रा. मैंदवाडी ता. धारुर) या दोन आरोपींना अटक केली होती. आतापर्यंत एकूण तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. दरम्यान, प्रतिक घुले यास आज बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!