• Sun. Apr 19th, 2026

केज शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी नगरपालिकेचा दर्जा द्यावा  आ. नमिता मुंदडा यांची विधिमंडळात मागणी

Bybaba maske

Dec 19, 2024

केज शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी नगरपालिकेचा दर्जा द्यावा 

आ. नमिता मुंदडा यांची विधिमंडळात मागणी

रोखठोक न्युज 

केज / प्रतिनिधी :- शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अस्तित्वात असलेली नगरपंचायत नागरिकांना सुविधा देण्यात कमी पडत आहे विकासाचे प्रश्न मिळणाऱ्या तोकड्या निधीमुळे प्रलंबित आहेत म्हणून केजला नगरपालिकेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी विधिमंडळात केली आहे 

 2009 साली केजच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले त्यावेळी केजच्या विकासाला चालना मिळेल असा अंदाज होता परंतु तसे होत नसल्यामुळे शहराच्या विकासाची अनेक प्रश्न प्रलंबित राहिली आहेत त्यातच आता शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे त्यामुळे निधीची कमतरता दिसू लागली आहे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यातही नगरपंचायत अपुरी पडत आहे त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हीच बाब लक्षात घेत आ नमिता मुंदडा यांनी शहराच्या विकासाची दारे खुली व्हावेत यासाठी विधिमंडळात केजला नगरपालिकेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली आहे 

—————————————————

सासूने नगरपंचायत आणली तर सून नगरपालिका आणणार 

दरम्यान 2009 मध्ये कै विमलताई मुंदडा यांनी केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे केजला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला होता त्यामुळे शहराच्या प्रगतीची दारे खुली झाली होती आता सासूच्या पावलांवर पाऊल टाकत आ नमिता मुंदडा यांनी शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न चालवले आहेत

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!