• Thu. Jun 25th, 2026

मस्साजोग व परभणी येथील घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची दलित आक्रोश मोर्चातुन केजमध्ये भिमसैनिकांची मागणी

Bybaba maske

Dec 18, 2024

मस्साजोग व परभणी येथील घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची दलित आक्रोश मोर्चातुन केजमध्ये भिमसैनिकांची मागणी

रोखठोक न्युज (महादेव गायकवाड)सौजन्य 

केज दि.१८ ( प्रतिनिधी ) बीड जिल्हयातील मस्साजोग येथील व परभणी येथील घटनेचा निषेध करत केजमध्ये भिमसैनिकांनी बुधवारी सकाळी आकरा वाजता शहरातून आक्रोश मोर्चा काढून या दोन्हीही घटनेचा निषेध करत केजचे तहसीलदार यांना निवेदन देऊन या दोन्हीही घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली या आक्रोश मोर्चात भिमसैनिक मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते.

   बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे आपहरण करुन खुन करुन प्रेत दैहटना फाट्यावर फेकून आरोपी फरार झाले आहेत.या गुन्ह्यातील चार आरोपी अटक केली आहे.तर मुख्य आरोपी हे फरार असुन त्यांना अटक करण्याची मागणीसाठी व परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी या तरुण युवकाचा पोलीसांच्या मारहानीत मृत्यु झाला या प्रकरणातील आरोंपीना अटक करुण त्यांना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी केज मध्ये तरुण भिमसैनिकांनी १८ डिंसेबर बुधवार रोजी शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून आक्रोश मोर्चा काढून सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीच्या घोषणा देत हा मोर्चा शहरील मुख्य रस्यावरुन केज तहसील कार्यालयासमोर आल्यावर प्रमुख भिमसैनिकांनी आपले विचार मांडून या मयतांच्या कुंटुबाला न्याय द्यावा व दोन्हीही घटनेच्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी लेखी निवेदनातून केजचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येंने भिमसैनिक सहभागी झाले होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!