• Wed. Apr 29th, 2026

विष्णु चाटे याला अटक. सरपंच संतोष देशमुख खुनातील आरोपी.

Bybaba maske

Dec 18, 2024

विष्णु चाटे याला अटक.

सरपंच संतोष देशमुख खुनातील आरोपी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी विष्णु चाटे याला एसपी अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात एलसीबीने अटक केली आहे.खुन होताना शेवटपर्यंत हा इतर आरोपीस फोनवरून बोलत होता.आता त्याला गजाआड करण्यात एलसीबी यश आल्याने सगळे धागेधोरे उलघडण्यास सुरुवात होईल.

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चारवर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी असल्याचे बोलले जात आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. मात्र पक्षातून त्याचा निलंबन करण्यात आले आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा खून (9 डिसेंबरला) झाला होता. आज नवव्या दिवशी विष्णू चाटे याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह इतर दोघे अद्याप फरार आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!