• Wed. Apr 29th, 2026

परळीतील अमोल डुबे अपहरण प्रकरणातील आरोपी जेरबंद. मुद्देमाल व गावठी कट्टाया सह आरोपी अटक  एसपींच्या नेतृत्वात परळी पोलिसांची मोठी कारवाई

Bybaba maske

Dec 16, 2024

परळीतील अमोल डुबे अपहरण प्रकरणातील आरोपी जेरबंद.

मुद्देमाल व गावठी कट्टाया सह आरोपी अटक 

एसपींच्या नेतृत्वात परळी पोलिसांची मोठी कारवाई

रोखठोक न्युज वार्ताहर 

परळी – डूबे अपहरण प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात परळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, विशेष म्हणजे पळवलेले 10 तोळे सोन्याचे बिस्कीट, नगदी 112,000 हजार रुपये ही जप्त करण्यात आले आहेत, तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी आणि एक गावठी कट्टाही केला जप्त करण्यात आला आहे.

 

पोलीस ठाणे परळी शहर गुरनं. 192/2024 कलम 126 (2), 140 (2), 308(3),(4)(5), 351(2), (3),3 (5) बी.एन.एस. सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील फिर्यादी नामे अमोल विकासराव डुबे रा. टेलर लाईन परळी वै. ता. परळी जि.बीड, यांनी फिर्याद दिली की, दिनांक 09/12/2024 रोजी रात्री 09.00 ते 11.30 वा. दरम्यान अनोळखी पाच ईसमांनी तोंडाला रुमाल बांधुन येवून त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना गाडीत टाकुन जबरदस्ती घेवून जावुन बंदुकीचा धाक दाखवुन जिवे मारण्याच्या धमक्या देवुन त्यांना कारमध्ये अपहरण करुन कन्हेरवाडी घाटामध्ये घेवून जावून त्यांच्याकडून खंडणी म्हणून त्यांच्याकडे असलेली नगदी 3,88,300/- व 10 तोळे सोन्याचे बिस्कीट किंमत अंदाजे 4,00,000/- असा एकुण 8,28,300/- रुपयाचा माल घेवुन गेले आहेत. वगैरे मजकुराचे फिर्याद वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधिक्षक बीड, श्री. अविनाश बारगळ यांनी दिलेले आदेश, मा. अपर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तीडके यांनी केलेले मार्गदर्शन व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई अती. पदभार अंबाजोगाई श्री. राजगुरु यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे तपासी अंमलदार श्री. धनंजय ढोणे पोलीस निरीक्षक संभाजी नगर, परळी वै. यांनी तपास केला. आरोपी शोधकामी वेगवेगळे तपास पथके तयार करुन CCTV फुटेजचे अवलोकन करुन व गोपनीय बातमीदारांकडुन गोपणीय माहिती घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आनुन. IT सेल बीडच्या मदतीने घटनास्थळाचे मोबाईल टॉवरचे डमडाटा घेवुन CCTV फटेजच्या मदतीने आरोपी येण्याजाण्याचा मार्ग शोधुन काढून आरोपी निष्पन्न केले. गुन्हयातील आरोपी नामे ।) चैतन्य पंढरी उमाप वय 24 वर्ष रा. पळसखेडा ता केज जि बीड ह.मु. परळीवेस, अंबाजोगाई जि बीड 2) सागर ऊर्फ बबलु शंभु सुर्यवंशी वय 22 वर्षे रा. आंबेडकर चौक आनंदनगर लातुर ह. मु. परळीवेस अंबाजोगाई 3) शंकर भगवान जोगदंड वय 22 वर्षे रा. साठे नगर परळीवेस ता. अंबाजोगाई 4) सचिन श्रीराम जोगदंड वय 25 वर्षे रा. साठे नगर परळीवेस ता. अंबाजोगाई 5) जय ऊर्फ सोनु संजय कसबे वय 26 वर्षे रा. सिध्दार्थ नगरपरळी वै. गुन्हयातील आरोपीतांना निष्पन्न करुन अटक केले. फिर्यादी यांचेकडुन खंडणी पोटी घेवुन गेलेले 10 तोळे सोन्याचे बीस्कीट 8,00,000/- रुपयाचे व नगदी 112,000/- रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हयात फिर्यादीचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कार स्वीफ्ट डी शायर किमती 2,00,000/- रुपये व टाटा पंच किमती 6,00,000/- असा एकुण 17,12,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आरोपी नामे सचीन श्रीराम जोगदंड याचे

ताब्यातुन गुन्हयात वापरण्यात आलेली गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. गुन्हयाचा मास्टर माइंड जय संजय कसबे याची गोपनीय माहिती मिळवुन तपास पथकाने त्यास पुणे येथे अटक केलेले आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक बीड, श्री. अविनाश बारगळ साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तीडके व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई अती. पदभार अंबाजोगाई श्री. राजगुरु यांचे मार्गदर्शना खाली 1) पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ नाचण 2) पोलीस निरीक्षक श्री. धनंजय ढोणे साहेब, 3) सहा. पोलीस निरीक्षक श्री. योगेश शिंदे (4) सहा. पोलस निरीक्षक श्री. नितीन गड्डुवार 5) पोह/1253 नरहरी नगरगोजे, 6) पोह/1224 बालाजी दराडे 7) पोह/562 भास्कर केंद्रे, 8) पोह/1145 गोर्वीद येलमटे, 9) पोह/1753 अंकुश मेंडके, 10) पोना/1918 गोवींद भताने 11) पोअं/1313 पंडीत पांचाळ, IT सेल बीड चे 12) पोअं/2068 वीक्की सुरवसे यांनी सदरची कामगीरी पार पाडली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!