• Sun. Apr 19th, 2026

यश कन्स्ट्रक्शन शहरातील नाल्या निकृष्ठ पध्दतीने करत आहेत. सा .बांधकाम विभाग डोळे झाकून गप्प झोपेच सोंग घेतय का? काॅप नगरसेवक हारून इनामदार यांच्या पत्नीच्या वार्डात बोगस काम होत आहे?

Bybaba maske

Dec 25, 2024

यश कन्स्ट्रक्शन शहरातील नाल्या निकृष्ठ पध्दतीने करत आहेत.

सा .बांधकाम विभाग डोळे झाकून गप्प झोपेच सोंग घेतय का?

काॅप नगरसेवक हारून इनामदार यांच्या पत्नीच्या वार्डात बोगस काम होत आहे?

रोखठोक न्युज वार्ताहर 

वार्ड क्रमांक आठ मधील कंळब रोड ते चिंचोली-टाकळी रोड चे रस्ते 76 कोटीच्या निधीतून चालू आहेत. सध्या विट भट्टीच्या पुढे नाल्या बांधकाम चालु असून एकदम निकृष्ठ पध्दतीत बनवणे चालू आहे,  गेल्या 15 दिवसांपासून यांच्यावर पाणीच टाकले नाही( Watring) कारण विचारले असता पाण्याच्या टँकर चे टायर फुटले असून ते दोन तीन दिवसात अंबाजोगाई येथून येईल पण पाणी नसल्या मुळे सिमेंट ची राख होत आहे.तसेच नाली बनवण्या साठी 1 एम एम  चा गज वापरण्यात येत आहे,ऐवढ्या हलक्या दर्जेचा गज वापरलातर त्यावर होणारा जोडणारा रस्त्यावरील  स्लॅप टिकणार आहे का?

 असे पश्न उपस्थित होत आहेत.नगरपंचायत ने दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रा वर असे बोगस कामे चालू असताना नगरपंचायत % घेऊन गपगार पडली आहे.हा वार्ड क्रमांक आठ हा काॅप नगरसेवक हारून इनामदार यांच्या पत्नी चा असल्याने त्याने यात लक्ष देण्याची अवश्यकता असताना ते या गोष्टी नजरअंदाज करत असतील तर यात खरेच काळेबेरे असल्याचा संशय येतोय असे वार्ड क्रमांक आठ मधील नागरिक म्हणत आहेत.यात तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लक्ष घालावे व यश कन्स्ट्रक्शन वर कारवाई करावी अशी मागणी वार्ड क्रमांक आठ चे नागरिक करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!