देशमुख यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत.
बड्या नेत्याला फोन केल्याची माहीती?
https://x.com/anjali_damania/status/1873298187345174764?t=OSZybIDURdrngnVjDswlCA&s=19
रोखठोक न्युज वार्ताहर
मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी महामोर्चा काढत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आता या आंदोलनाची धग हळूहळू राज्यभर पसरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेर्धात आज पुण्यातही निषेध मोर्चा काढण्यात आला. यामुळे आरोपींवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव बनत चालला आहे.
दरम्यान आता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. अटक केलेल्या एका आरोपीच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ सापडले आहेत. आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलध्ये हे व्हिडीओ सापडले असून पोलिसांनी हे सगळे व्हिडीओ ताब्यात घेतले आहेत. याबाबतची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘न्यूज १८ मराठी’ला दिली आहे.तसेच अंजली दमानीया यांनी सुद्धा ही खबर एक्स या समाज माध्यमातून केले आहे.
