दोन हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक सापडला.
गटशिक्षण अधिकाऱ्याची सही घेण्यासाठी केली होती पैशाची मागणी
रोखठोक न्युज वार्ताहर
केज- वैद्यकीय रजेवर कर्तव्यात रुजू करून घेण्याच्या अर्जावर गटशिक्षण अधिकाऱ्याची सही घेण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात लाचलूचपत विभागाने गुन्हा दाखल केला.
सदरील हा मुख्याध्यापक केज तालुक्यातील विडा येथील आहे. सहशिक्षक सचीन नन्नवरे हे वैद्यकीय रजेवर होते. त्यांची रजा संपल्यानंतर कर्तव्यावर रुजू करून घेण्यासाठी त्यांनी विडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुर्वे यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जावर गटशिक्षण अधिकाऱ्याची सही घेण्यासाठी मुख्याध्यापक सुर्वे यांनी सहशिक्षक नन्नवरे यांच्याकडे पैशाची मागणी केली. दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत नन्नवरे यांनी लाचलूचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाचलूचपत विभागाने सापळा रचला होता. सुर्वे यानीं 2 हजार रुपये घेण्याचा प्रयत्न केला होता. तसे सिद्ध झाले. त्यामुळे सुर्वे यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील ही कारवाई पोलीस
निरीक्षक लाचलूचपत विभाग यांनी केली असून या प्रकरणाचा अधिक तपास शेख युनूस हे करत आहेत.
