*संतोष देशमुख हत्या प्रकरण : सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला अटक करण्यात पोलिसांना यश*
डाॅ.संभाजी वायबसे ला ताब्यात घेतले आणि आरोपी सापडले.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली. अद्याप एक आरोपी फरार आहे. बीड, केज, पोलीस दल, सीआयडी व एस आय टी पथकाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. मुख्य आरोपी सापडत नसल्याने जनतेमध्ये मोठा रोष होता. कालच पोलिसांनी आरोपींना फरार होण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून केज येथील डॉ. वायबसे याच्यासह तिघांना ताब्यात घेतले होते.
खूना नंतर 9 तारखे पासुन डॉक्टर संभाजी वायबसे हा सुद्धा होता,नातेवाईकाचा मृत्यू झाला तरी हा उपस्थित नव्हता म्हणून पोलीसांचा संशय वाढला होता.मुख्य आरोपीचा शोध घेता घेता त्याच समांतर पातळी वर डॉक्टर वायबसेचा सुद्धा शोध चालुच होता. डॉक्टर वायबसे हा नांदेड येथे असल्याचे कळताच त्याला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर आरोपीचे लोकेशन कळाले व त्यांना पुण्यातून ताब्यात घेतले.डॉक्टर वायबसे हा आरोपींन मदत करत असल्याचा संशय पोलीसांना आहे.
त्यानंतर मुख्य आरोपी सापडल्याने पोलिसांना मोठे यश मिळाले असून यामुळे संतोष देशमुख हत्येचा तपास वेगाने होणार आहे.
