• Fri. May 1st, 2026

पोलीस मुख्यालयात अनंत इंगळे या पोलीस कर्मचाऱ्यांची गळफास लावून आत्महत्या

Bybaba maske

Jan 8, 2025
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?

पोलीस मुख्यालयात अनंत इंगळे या पोलीस कर्मचाऱ्यांची गळफास लावून आत्महत्या

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड – जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अनंत मारोती इंगळे (रा. कळंमआंबा ता. केज जि बीड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत इंगळे यांची ड्युटी सध्या पोलीस मुख्यालयात होती. ते पोलिस वसाहतीत राहात होते. बुधवारी सकाळी (8 जानेवारी) मुख्यालयाच्या आवारातील एका आवळ्याच्या झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. शिवाजीनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अनंत इंगळे यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन सेवेत लागलेल्या इंगळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. बीड पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!