• Fri. May 1st, 2026

सहावीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण. पोलीसांकडून पाठलाग. आरोपी मोटारसायकल सोडून पसार. 

Bybaba maske

Jan 8, 2025

सहावीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण. पोलीसांकडून पाठलाग. आरोपी मोटारसायकल सोडून पसार. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातून एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी माहिती मिळताच अपहरण करणाऱ्या तरुणाचा पाठलाग केला. परंतु, अपहरणकर्ते त्यांची मोटार सायकल सोडून पळून गेले. या प्रकरणी मुलीच्या आईन केज पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, आई-वडील ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेले असताना अल्पवयीन मुलगी, तिची बहीण व भाऊ आजी सोबत जिवाचीवाडी येथे आजोळी राहत होते. सहावीच्या वर शिक्षण घेत असलेली मुलगी केज येथील वसंत विद्यालयात शिकत आहे. सोमवारी (दि. ६) मुलगी बाहेर गेली होती. त्यावेळी टाकळी ( केज) येथील राजेश उत्तरेश्वर बारगजे याने मोटार सायकलवरून ति अपहरण केले.

पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड, पोलीस जमादार राजू वंजारे, पोली नाईक शमीम पाशा यांनी आरोपींचा पाठलाग केला. मात्र, आरोपी कळंब तालुक्यातील परिसरात त्याची मोटार सायकल सोडून मुली घेऊन पळून गेला. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार राजू वंजारे तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!