• Fri. May 1st, 2026

संतोष देशमुख हत्याकांडाला एक महिना पूर्ण खून प्रकरणातील सात आरोपी अटक; एक आरोपी अद्यापही फरारच; कठोर कारवाईची मागणी तीस दिवसाचा घटनाक्रम असा आहे.

Bybaba maske

Jan 10, 2025

संतोष देशमुख हत्याकांडाला एक महिना पूर्ण

खून प्रकरणातील सात आरोपी अटक; एक आरोपी अद्यापही फरारच; कठोर कारवाईची मागणी

तीस दिवसाचा घटनाक्रम असा आहे.

रोखठोक न्युज वार्ताहर 

संतोष देशमुख यांच्या हत्या होऊन एक महिना उलटून गेला आहे तरी यातील सर्व आरोपी अटक झाले नाहीत यातील कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. तसेच मारेकरी फरार असताना त्यांना रसद पुरवून त्यांना आर्थिक मदत करणारे डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांची पत्नी अॅड. सुरेखा वायबसे यांच्यासह वाल्मीक कराड यांच्यावर सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. तसेच वाल्मीक कराड याला गाडी पुरविणारा शिवलिंग मोराळे याची अद्याप चौकशी झाली नसल्याने त्याची गाडी ताब्यात परंतु त्याला मोकाट का सोडले अशी चर्चा सुरू आहे

घटनाक्रम

६ डिसेंबर आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात सुदर्शन घुले आणि त्याच्या गुंडाचा गोंधळ व मारहाण, ९ डिसेंबर सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुषपणे हत्या, १० डिसेंबर केज तालुक्यात रास्ता रोको, तीव्र आंदोलन, जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना तांबवा येथून अटक, ११ डिसेंबर खंडणी प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विष्णू चाटे याचे आरोपींमध्ये समावेश, १२ डिसेंबर हत्याकांडातील तिसरा आरोपी प्रतीक घुले याला पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले., १३ डिसेंबर केज येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी बैठक घेऊन शांततेचे आवाहन, १८ डिसेंबर विष्णू चाटे याला बीड मध्ये अटक तसेच ६ डिसेंबरच्या गुन्ह्यात

अॅट्रॉसिटीची वाढ, १९ डिसेंबर विष्णू चाटे याला न्यायालयात हजर त्याला २७ डिसेंबर पर्यंत ७ दिवसांची कोठडी, २३ डिसेंबर जयराम चाटे आणि महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्या कोठडी वाढविली, २७ डिसेंबर- विष्णू चाटे याची ५ जानेवारीपर्यंत कोठडी वाढविली, २८ डिसेंबर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा, २९ डिसेंबर फरार आरोपी बाल्मीक कराडची पत्नी मंजीली कराड हिची केज पोलिस ठाण्यात चौकशी, ३१ डिसेंबर वाल्मीक कराड याचे पुणे येथील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण आणि वाल्मीक कराड याला न्यायालयात हजर केले. मध्यरात्री न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली, १ जानेवारी आरोपींच्या अटकेसाठी नागरिकांचे जलसमाधी आंदोलन, २ जानेवारी फरार आरोपीची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी बक्षीस जाहीर केले.,

४ जानेवारी सुदर्शन घुले, महेश घुले आणि आणि संतोष देशमुख यांना पुण्यातून तर यांचे लोकेशन मारेकऱ्यांना देणारा सिद्धार्थ सोनवणे याला कल्याण येथून ताब्यात घेतले., ६ जानेवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले या तिघांना दि. १८ जानेवारीपर्यंत १२ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. तर खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला

१० जानेवारीपर्यंत ४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. ७ जानेवारी – वाल्मीक कराड याने पुणे येथे वापरलेली शिवलिंग मोराळे यांची स्कॉर्पिओ गाडी केज पोलिसांच्या ताव्यात, ८ जानेवारी विष्णू चाटे आणि जयराम चाटे यांना केज पोलीस ठाण्यात आणून चौकशी आणि राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाची झाडाझडती. गुन्ह्यातील काळी स्कॉर्पिओ आणि विष्णू चाटे याची फोर्ड गाडी केज पोलिसांच्या ताब्यात.

देशमुख कुटुंबीयांची अनेकांनी भेट घेऊन केले सांत्वन

ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, छबपती संभाजी राजे, मंत्री संजय सिरसाठ, खा. रजनीताई पाटील, खा बजरंग सोनवणे, खा. ओमराजे निंबाळकर, मंत्री उदय सामंत, मंत्री मेघना बोरडीकर,आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता मुंदडा, आ. रोहित पवार, आ. विजयसिंह पंडित, आ. सदाभाऊ खोत, अंजली दमानिया, पप्पू कागदे यांच्यासह अनेकांनी भेट देऊन सांत्वन केले आणि मारेकऱ्यांना फासावर लटकावण्याची मागणी केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!