• Wed. Apr 29th, 2026

खंडणी प्रकरणात गाजत असलेली आवादा कंपनीच्या कामगाराचा केज येथे मृत्यू.

Bybaba maske

Jan 17, 2025

खंडणी प्रकरणात गाजत असलेली आवादा कंपनीच्या कामगाराचा केज येथे मृत्यू.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 केज तालुक्यातील बहुचर्चित आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील पंजाबच्या मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाला आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह पीएम करण्यासाठी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!