• Sun. Apr 19th, 2026

विहीर खोदताना जिलेटीनच्या काडीचा स्फोट;एक ठार, तीन गंभीर जखमी. तिघे गभीर जखमी; पैकी दोघे चिंताजनक

Bybaba maske

Mar 20, 2025

विहीर खोदताना जिलेटीनच्या काडीचा स्फोट;एक ठार, तीन गंभीर जखमी.

तिघे गभीर जखमी; पैकी दोघे चिंताजनक

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील तळेगाव घाट शिवारात एका शेतकऱ्याच्य शेतामध्ये वैयक्तिक जलसिंचन विहिरीचे काम सुरू असताना ब्लास्टिंग करताना जिलेटीनचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एकावर स्वा.रा.ती. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवार सकाळी ११.३० वाजता घडली.

तालुक्यातील तळेगाव घाट तांडा शिवारातील उत्तम पांडुरंग आडे यांना शासनाच्या वैयक्तिक जलसिंचन विहिरीसाठी मंजुरी मिळाली होती. या विहिरीचे काम सुरू असताना मंगळवारी जिलेटीनचा स्फोट करण्यात आला होता. उर्वरित काम सुरू असताना बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास अचानक जिलेटीनचा स्फोट झाला. या स्फोटात धनराज अनंत दहीफळे (रा. खोडवा सावरगाव, ता. परळी) हे ५० फूट खोल विहिरीतून हवेत १० फूट उंच उडून परत विहिरीत पडले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याच स्फोटात पिंटू विठ्ठल दहीफळे आणि जीवन हरिश्चंद्र दहीफळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने स्वा.रा.ती. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या खासगी

रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच भारत तुकाराम पवार (रा. तळेगाव) हा देखील जखमी असून, त्याच्यावर स्वा.रा.ती. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अतिरिक्त पोलिस अधिक्षकांनी घटनास्थळी केली पाहणी

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक चेतना तिडके, पोलिस उपअधिक्षक चोरमले, बर्दापूर पोलिस ठाण्याचे ए.पी.आय. राजकुमार ससाने, बिट अंमलदार चेवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले.

उत्तम आडे यांच्या वैयक्तिक विहिरीच्या खोदकामासाठी खोडवा सावरगाव येथील हरिश्चंद्र दहीफळे व गोविंद दहीफळे यांच्या ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टरला काम देण्यात आले होते. हे काम सुरू असतानाच हा दुर्दैवी अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

या स्फोटामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून घटनास्थळी भेट दिली आहे.

हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. जिलेटीनच्या काडीचा अनवधानाने स्फोट होऊन काम करत असलेल्या कामगारांच्या जीवितांना धोका पोहचला, हे खूप गंभीर आहे. या स्फोटात एक व्यक्ती जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना रोखण्यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे, विशेषत: खाणकाम किंवा इतर धोक्याच्या कामांमध्ये सुरक्षा उपायांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे.

या घटनेच्या चौकशीसाठी संबंधित विभागांनी योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे, आणि शेतकऱ्यांना व कामगारांना यापुढे अशा दुर्घटनांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!