उपअभियंता वंदना साळवे यांच्या ऐवजी उंटावरून शेळ्या राखणाऱ्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे व सविता शेप यांची बदली करावी.
सरपंचा ऐवजी सरपंच पतीला अंदोलन करण्याचा कुठलाच अधिकार नसल्याने गोरख(बंडू) भांगे वर गुन्हा दाखल करावा.
गोरख भांगे यांनी लाच दिल्याने व आत्मदहन चा प्रयत्न केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज पंचायत समिती मध्ये आत्मदहन करूण घेण्याचे नाट्य घडले सरपंच पती असलेले गोरख उर्फ बंडू भांगे यांनी एमबी देत नाहीत 50 हजारांची लाच मागितली असताना त्यांना 20,000 रूपयांची लाच दिल्याचे तरी पण माझे काम करत नाहीत अशी कबुली सरपंच पती गोरख भांगे यांनी दिली, असे म्हणून अभियंता आंधळे,अभियंता चव्हाण व वंदना साळवे यांच्या वर आरोप करून आत्मदहनाचा प्रयत्न त्यांनी भरदिवसा पंचायत समितीत केला.असे असताना सरपंच पती यांनी लाच देऊन गुन्हा केला आहे भारतीय दंड संविधानात लाच देणे व घेणे गुन्हा असताना सरपंच पती ने लाच दिल्या चे कबूल केले आहे तरी त्याच्यावर कुठलाच गुन्हा दाखल नाही.तसेच सरपंच ही त्यांची पत्नी असताना सरपंचाने न्याय मागणे योग्य असताना त्यांचा पती असा आत्मदहना चा प्रयत्न करून प्रशासनास वेठीस कसा काय धरू शकतो तो सुद्धा एक गुन्हाच असल्याने प्रशासनाने त्याच्यावर दोन गुन्हे का दाखल केले नाहीत? महिला सरपंच असताना तिचा पती हा ग्रामपंचायत चा कारभार चालवतो हे त्याच्या आत्मदहना मुळे सिद्ध होत.हे गटविकास अधिकारी नजरे आड कसे करू शकतात? गटविकास अधिकारी मॅडम यांना सरपंच पती कारभार हाकतो हे मान्य आहे का?
तसेच तो दोन दिवसात माझे काम झाले नाहीतर मी पुन्हा दोन दिवसात आत्मदहन करेल अशी धमकी देत असताना प्रशासन मुग गिळून गप्प का?
तसेच वंदना साळवे यांच्या पेक्षा केज व अंबाजोगाई चा संयुक्त पदभार सांभाळणाऱ्या व वादग्रस्त असणाऱ्या समृद्धी दिवाणे यांचीच बदली का केली जात नाही व केज पंचायत समितीला स्वतंत्र गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात नाही.समृद्धी दिवाणे यांच्या आरोप केला जातो की त्या अंबाजोगाई येथून कारभार करतात व केजचा कारभार दोन ग्रामसेवक यांच्या वर सोपवला आहे.त्या कधीच शेतकरी,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना भेटत नाहीत असा आरोप होत आला आहे.तसेच आरोप झालेले आंधळे,चव्हाण यांना मोकळे सोडून वंदना साळवे यांची बदली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून सविता शेप या केज पंचायत समितीत कार्यरत आहेत त्यांची सर्वात जास्त सेवा ही केज पंचायत समितीत झाली असून त्यांची ही बदली करावी अशी चर्चा आता केज पंचायत समितीत दबक्या आवाजात चर्चा आहे.
