• Wed. Apr 29th, 2026

कोयत्याने वार करून तरूणाचा खून.

Bybaba maske

Apr 1, 2025

कोयत्याने वार करून तरूणाचा खून.

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई : आज मंगळवारी सकाळच्या वेळी शहरातील पोखरी रोडवर राजकुमार साहेबराव करडे (वय ३०, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) या तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते. जखमी राजकुमारचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना दुपारी मृत्यू झाला. या घटनेने शहर्ता खळबळ उडाली आहे. 

राजकुमार करडे याच्यावर पोखरी रोडवरील सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. दरम्यान, हा हल्ला कोणी व कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अंबाजोगाई शहर पोलीस तपास करत असून लवकरच याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद होणार असल्याचे समजते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!