अंबाजोगाई तो खून प्रेमप्रकरणातून,मुलीच्या भावाने व मित्राने मिळून काढला काटा.
रोखठोक न्युज वार्ताहर
अंबाजोगाई येथे पोखरी रोड वर राजकुमार कर्डे यांच्या वर कोयता,लाठी काठी ने वार वार केले होते त्याला अतिशय गंभीर अवस्थेत स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात दाखल केले.डॉक्टरानी शर्तीचे प्रयत्न करून ही रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
अंबाजोगाई पोलीस ठाण्यात त्याची आई केशरबाई साहेबराव कर्डे यांच्या फिर्यादीवरून तीन जनान वर गुन्हा दाखल झाला आहे.
एफआयआर नुसार राजकुमार कर्डे यांचे एका मुली वर प्रेम होते, त्या दोघांना लग्न करायचे होते पण दोघे विविध जातीचे असल्याने मुलीच्या घरच्यांचा लग्नास विरोध होता त्याच कारणाने पोखरी रोड येथे वृंदावन हाॅटेल येथे बसला असता वेंदात वैजनाथ शिंदे ,अजिनाथ भांडे व एक अनोळखी यांने कोयत्याने झाती, पोट, पाट,व चेहर्यावर वार केले त्यास रूग्णालयात दाखल केले असता रक्तस्त्राव जास्त झाल्याने मृत्यू झाला.आईच्या फिर्यादीवरून वैजनाथ शिंदे,वेंदात शिंदे,अजिनाथ भांडे यांच्या वर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास अंबाजोगाई पोलीस करत आह
