• Wed. Apr 29th, 2026

काल झालेल्या अंबाजोगाई येथील खुनात आला ट्वीस्ट  दोन वर्षा पूर्वी प्रेयसीच्या आईवर बलात्कार करुन ब्लॅक मेल करीत असल्याने आईने केली होती आत्महत्या !

Bybaba maske

Apr 3, 2025

काल झालेल्या अंबाजोगाई येथील खुनात आला ट्वीस्ट 

दोन वर्षा पूर्वी प्रेयसीच्या आईवर बलात्कार करुन ब्लॅक मेल करीत असल्याने आईने केली होती आत्महत्या !

गौतम बचुटे/केज 

अंबाजोगाई येथे प्रेम प्रकरणातून कोयत्याने वार करून खून करण्यात आलेल्या राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोन वर्षा पूर्वी त्याचे प्रेम असलेल्या कथित प्रेयसीच्या आईवर लातूर येथील लॉजवर बलात्कार करून, आई व मुली सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याने कथित प्रेयसीच्या आईने माहेरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त. केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच कथित प्रेयसीचे वडील व भाऊ यांनी त्याचा खून केला असल्याची माहिती फिर्यादीत केली आहे.

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई शहरातील राजकुमार करडे हा दोन वर्षा पासून शॉर्ट फिल्म बनवत होता.चनई येथील एका युवतीशी त्याचे प्रेम संबंध होते. ते दोघे लग्न करणार असल्याचे तो सांगत होता. मात्र तिचे वडील व भाऊ यांचा लग्नाला विरोध होता. दरम्यान दि. १ एप्रिल २०२५ रोजी राजकुमार करडे याच्यावर अंबाजोगाई येथील पोखरी रोडवर कथित प्रेयसीच्या वडील व भाऊ यांनी अन्य एकाच्या मदतीने कोयत्याने वार केले. त्यामुळे झालेल्या रक्तस्रावाने त्याचा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मयत राजकुमार करडे याची आई हिच्या फिर्यादी वरून चनई येथील वैजनाथ शिंदे, वेदांत शिंदे, या बाप लेकासह आदिनाथ भांडे, यांच्यावर

अंबाजोगाई येथील शहर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित प्रेयसीच्या आईवर बलात्कार करून मुलगी आणि आई सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने केली होती महिलेने आत्महत्या ! 

:-कोयत्याने वार करून खून झालेल्या राजकुमार करडे याने दोन वर्षा पूर्वी २२ ऑगस्ट २०२३ रोजी राजकुमार करडे याने नवऱ्या पासून विभक्त राहत असलेल्या विवाहिता आणि तिच्या मुली सोबत आणि तिच्या मुली सोबतचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन कथित प्रेयसीच्या आईशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. या बाबत पिडीतेने लातूर येथील गांधी नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध तक्रार देखील दिली होती. त्यामुळे राजकुमार करडे याच्या धमक्यांना व त्रासाला कंटाळून ३६ वर्षीय महिलेने

दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिच्या माहेरी डिघोळअंबा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी राजकुमार करडे यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी गु. र. नं. १९७/२०२३ भा. दं. वि. ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे तपास करीत होते.

चौकट… 

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये काय लिहिले होते

आत्महत्या केलेल्या पीडितेच्या अंगावरील जॅकेटच्या खिशात चिड्डी मिळुन आलेल्या चिड्डीत तिने लिहले होते की, आज पर्यंत जे झाल ते सहन केले; पण आता सहन होत नाही. माझ्या कुटुंबाला व मुलांना आणि आई-वडीलांना या पुढे कुणी त्रास देऊ नये. एवढीच शेवटची इच्छा. आज पर्यंत आशा होती की, मी यातुन बाहेर येईल म्हणुन पण जेवढ्या धमक्या आज पर्यंत त्याने दिल्या त्या सगळ्या सगळ्या केल्या. आता बस्स आता त्याला शिक्षा झाली पाहिजे. मला यातून कुणी बाहेर नाही काढु शकले. पण माझ्या नंतर मी मेल्या नंतर तरी त्याला शिक्षा भेटावी. माझी इज्जत घालवली त्याने, म्हणून मी आत्महत्या करत आहे. असा आत्महत्ये पूर्वी लिहलेले चिट्ठीत तिने लिहिले होते.

तब्बल वीस दिवसा नंतर झाला होता राजकुमार करडेवर गुन्हा दाखल

पीडित महिलेने दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी डिघोळअंबा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या नंतर २० दिवसांनी दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी राजकुमार करडे यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!