• Wed. Apr 29th, 2026

अवादा कंपनीत दरोडा टाकणारी टोळी पकडली आरोपींवर मकोका लावण्यासाठी प्रस्ताव पाठविणार-पोलीस अधिक्षक काँवत

Bybaba maske

Apr 15, 2025

अवादा कंपनीत दरोडा टाकणारी टोळी पकडली

आरोपींवर मकोका लावण्यासाठी प्रस्ताव पाठविणार-पोलीस अधिक्षक काँवत

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड – केज तालुक्यातील विडा शिवारात असलेल्या अवादा कंपनीच्या मालकीचे पवनचक्कीसाठी वापरले जाणारे साहित्य सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधून मारहाण करत दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामध्ये चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तर इतर निष्पन्न झालेल्या आरोपींना देखील ताब्यात घेवून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्या संदर्भात प्रस्ताव पाठविणार असल्याचे पोलीस अधिक्षक काँवत यांनी सांगितले. मागिल काही महिन्यात बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पवनचक्कीसाठी आणलेल्या साहित्याची चोरी, लुट होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. 7 एप्रिल रोजी केज तालुक्यातील विडा शिवारात असलेल्या अवादा कंपनीच्या दोन सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधून मारहाण करत तेथील कॉपर केबल कटरच्या सहाय्याने कापून दरोडा टाकण्यात आला होता. यात 12 लाख 87 हजार 800 रूपये किमतीचे केबल चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते. या शोध मोहिमेला यश प्राप्त झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख व त्यांच्या टीमने हा गुन्हा उघडकीस आणला. 14 एप्रिल 2025 रोजी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून गुन्ह्यात वापरलेली महेंद्रा बोलेरो आणि दहा आरोपी निष्पन्न करण्यात आले. पैकी बबन सरदार शिंदेरा.नांदूर, ता. केज, धनाजी रावजी काळे रा. लक्ष्मी पारदी वस्ती जि. धाराशिव, मोहन हरी काळे (रा. लक्ष्मी पारदी वस्ती जि. धाराशिव), लालासाहेब सखाराम पवार (रा. धसमेगाव ता. वाशी) या चार जणांना ताब्यातघेतले. आरोपींकडून 11 लाख 58 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात सापडलेल्या आरोपींनी वेगवेगळ्या गुन्ह्यात आपण असल्याची कबूली दिली आहे. केज पोलीस ठाण्यात, नेकनूर पोलीस ठाण्यात आणि पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये पवनचक्कीसाठी वापरले जाणारे कॉपरचे वायर, ट्रान्सफार्मरसाठी वापरले जाणारेकॉपरचे वायर लुटून नेल्याची कबूली दिली आहे. एकूण या आरोपींवर 27 गुन्हे दाखल असून ही एकत्रित दरोडा टाकणारी संघटीत टोळी असल्याचे पुढे येतअसल्यामुळे सदरच्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्या संदर्भात प्रस्ताव पाठविणार असल्याचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी सांगितले. या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला पोलीस अधिक्षक काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख आणि आरोपींना पकडण्याची कारवाई करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने,

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!