• Thu. Apr 30th, 2026

भाजप कार्यकर्त्याची हत्या, हत्या करणारा आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने घडली घटना!

Bybaba maske

Apr 15, 2025

 भाजप कार्यकर्त्याची हत्या, हत्या करणारा आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने घडली घटना!

रोखठोक न्युज वार्ताहर

माजलगाव : तालुक्यातील किट्टीआडगाव येथील भाजपाचे विस्तारक बाबासाहेब आगे याच्यावर कोयत्याने वार करून भर दिवसा खून करण्यात आला. सदरील खून करणारा आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला असून आरोपी विरूध्द पोलीस प्रशासनाची कारवाई

दुपारपर्यंत सुरू होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर भाजप कार्यालयासमोर भाजपचे तालुका सरचिटणीस बाबासाहेब प्रभाकर आगे (वय ३० वर्षे) याची हत्या करण्यात आली. आज मंगळवारी एका तरुणाने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोयत्याने सपासप वार
करत आगेची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन हजर झाला. माजलगावमध्ये स्वामी समर्थ मंदिरा पाठीमागे भाजप कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोर भाजपच्या तालुका सरचिटणीस बाबासाहेब प्रभाकर आगे हा उभा होता. तेथे नारायण शंकर फपाळ राहणार बेलूरा हा तरुण आला. आणि त्याने आगे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात आगे हा रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. सदरील मयत बाबासाहेब आगे याचा ज्या ठिकाणी खून करण्यात आला. त्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव शासकीय रूग्णालयात पाठविला आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने हत्येची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ माहिती घेत आहेत. दरम्यान भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!