• Sun. Apr 19th, 2026

मांजरसुंभा ते लोखंडीसावरगाव पर्यंत कंटेनरचा थरार ! केजमध्ये कंटेनरने अनेकांना चिरडले ; चार ठार 20 ते 25 जन जखमी

Bybaba maske

May 16, 2025

मांजरसुंभा ते लोखंडीसावरगाव पर्यंत कंटेनरचा थरार ! केजमध्ये कंटेनरने अनेकांना चिरडले ; चार ठार 20 ते 25 जन जखमी

रोखठोक न्युज वार्ताहर 

मांजरसुंबा येथून केज आणि लोखंडी सावरगाव पर्यंत एका भरधाव  कंटनेरने आज दुपारी अनेकांना धडका देता गेला असून यामध्ये आतापर्यंत चार जण ठार झाल्याचे बोलले जात आहे.तर 20 ते २५ नागरिक जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे या रस्त्यावर या कंटेनरचा थरार पाहीला मिळाला. हा कंटेनर लोखंडी सावरगाव येथे पलटी झाल्याने पुढे घडणार अनर्थ टळला आहे.

आज शुक्रवारी दुपारी एक कंटेनर मांजरसुंबा येथून केज कडे येत होता. या कंटेनरने केज शहरात शिक्षक कॉलनी ते धारुर चौक दरम्यान अनेकांना धडक दिली.केज येथे टाकळी येथील सौ.मिना घोडके या अपघातात जागीच ठार झाल्याच समजत आहे. तरी पण तो न थांबता तसाच निघून गेला पुढे चंदन सावरगाव जवळही या कंटेनरने छत्रपती शिवाजीमहाराज  चौकाला धडक दिली. पुढे कंटेनर आणि मागे माणसं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. हे दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडाला असून, या अपघातात चारजण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात असून २५ जण जखमी झाले आहेत. तर हा कंटेनर चालक मांजरसुंबा येथेही धडकून आल्याचे सांगितले जात आहे. तर लोखंडी सावरगाव येथे कंटेनर पलटी झाल्याने पुढे घडणारा अनर्थ टळला आहे. लोखंडीसावरगाव येथे कंटेनर पलटी झाल्या नंतर तो कंटेनर जमावाने पेटवून दिला.  केजमध्ये आज आठवडी बाजार असल्याने या रस्त्यावर जास्त गर्दी असल्याने खूप मोठा अनर्थ होता होता वाचला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!