• Sat. Apr 18th, 2026

आयशर टेम्पो ने सहा जणांना उडवले, अपघातात सहा जणांचा मृत्यू.

Bybaba maske

May 27, 2025

आयशर टेम्पो ने सहा जणांना उडवले, अपघातात सहा जणांचा मृत्यू.

रोखठोक न्युज वार्ताहर 

सोमवार हा वार अपघाताचा वार ठरला असून दुपारी माजलगाव येथील भाजप माजी आमदार लातूर जवळ देशमुख यांच्या वाहनाचा अपघात होवून मृत्यू झाला.

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गेवराई जवळ रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो ने सहा जणांना उडवले यात सहा जणांचा मृत्यू झाला. माहितीनुसार आयशर टेम्पोने टोचन करुन नेण्यासाठी चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा जणांना भरधाव वेगात धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला. अपघातानंतर टेम्पोसह चालक फरार झाल्याचे सांगण्यात आले.

 रात्री ८.३० वाजता गढी येथील कारखान्यासमोर आतकरे यांच्या मुलाचा एक्स यू व्ही वाहन डिव्हायडरवर आदळून किरकोळ अपघात झाला होता.या अपघातात कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी क्रेन घेऊन आतकरे आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी आले होते, अतकरे याची कार क्रेन ने डिव्हाईडर मधून बाजूला काढत असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने त्यांना जबर धडक दिली.या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर, प्रचिन ननवरे यांचा मृत्यु झाल्याची माहिती आहे.तर एक जखमीला उपचार सुरू आहे.या अपघाताची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच घटना स्थळकडे धाव घेतली.या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याने गेवराई मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!