• Sat. Jul 19th, 2025

अनैतिक संबंधाच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू तर एक जखमी. मोटार सायकल अडवून शेतात नेवून झाडाला बांधून केली काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण.

Bybaba maske

May 27, 2025

अनैतिक संबंधाच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू तर एक जखमी.

मोटार सायकल अडवून शेतात नेवून झाडाला बांधून केली काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनैतिक संबंधाच्या संशया वरून एका युवकाला त्याची मोटार सायकल अडवून शेतात नेवून झाडाला बांधून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे वय २७ वर्ष रा. भाटुंबा ता. केज व त्याचा मित्र सचिन करपे याला दि. २६ मे रोजी दुपारी ४:३० वा. च्या सुमारास सावळेश्वर ता. केज येथील रोहन मस्के, सोन्या मस्के तसेच लाडेगाव येथील चार ते पाच जणांनी अडवून त्याला रोहन मस्के यांच्या मामाच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्याला शेतातील झाडाला बांधून त्या सर्वांनी लाकडी काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण केली आणि त्या नंतर त्याला जखमी अवस्थेत पावनधाम जवळ असलेल्या रस्त्यावर टाकून दिले. तसेच याची माहिती मारहाण करणाऱ्यांनी अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे याच्या मोबाईल वरून त्याचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याला दिली. त्या नंतर सिद्धेश्वर धपाटे आणि गावातील लोकांनी अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे याला अंबाजोगाई येथे दाखल केले. त्या नंतर काही वेळाने अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे हा मयत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी सिद्धेश्वर धपाटे याच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. १४०/२०२५ भा. न्या. सं. १०३(१), १४०(२), ११५(३), ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!