• Sun. Apr 19th, 2026

छत्रपती मल्टीस्टेटच्या शटरच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन ठेवीदाराची आत्महत्या.

Bybaba maske

Jun 18, 2025

छत्रपती मल्टीस्टेटच्या शटरच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन ठेवीदाराची आत्महत्या.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट ठेवीदारांचा प्रश्न पुन्हा पेटला असून,ज्ञानराधा मल्टीस्टेट, छत्रपती, मा जिजाऊ, राजस्थानी सह इतर मल्टीस्टेट मध्ये ठेवीदाराच्या लाखोंच्या ठेवी अडकल्याने ठेवीदार अडचणीत सापडला आहे.

मागील एक वर्षापासून जिल्ह्यातील मल्टिस्टेस्ट विविध करणारे बंद पडल्याने ठेवीदार मात्र मेटाकुटीला आले आहेत. ठेवीदारांना शैक्षणिक, शेती ,दवाखाना, तसेच इतर व्यवहारासाठी पैसे लागत असल्याने ठेवीदार अडचणीत सापडला आलेत. गेवराई शहरातील छत्रपती मल्टीस्टेट समोर सुरेश आत्माराम जाधव वय ४२ वर्ष राहणारा.खळेगाव यांनी आज मध्यरात्री मल्टीस्टेट समोरील शटरच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला. सुरेश जाधव यांचे छत्रपती मल्टीस्टेट मध्ये ठेवी होत्या त्यांना पैशाची गरज भासल्याने त्यांनी मल्टीस्टेट आपल्या ठेवीची, पैशाची मागणी केली होती. परंतु त्यांना पैसे देण्यास मॅनेजरने टाळाटाळ केल्याने जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच जेवढ्या पोलीस ठाण्याची पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सुरेश जाधव यांचा मृतदेह गेवराई येथील रुग्णालयात पाठवण्यात आला.

जोपर्यंत बँकेची व्यवस्थापक मॅनेजर, अध्यक्ष वर गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत सुरेश जाधव यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचां पवित्रा जाधव कुटुंबीयांनी घेतला. जाधव यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली असून आता तरी बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट अध्यक्ष हे ठेवीदारांच्या ठेवी परत देतील का असा प्रश्न पडला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!