खासगी क्लासेसच्या शुल्कावर नियंत्रण कोण ठेवणार?
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरात सर्वत्र खासगी क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे. एकीकडे इंग्रजी शाळांचे अवाजवी शुल्क तर दुसरीकडे कोचिंग क्लासेसची गगनाला भिडलेले शुल्क यात पालकांचे बजेट पूर्णतः कोलमडत आहे. दर्जेदार सोयीसुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण असलेल्या खासगी मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये पाल्य शिक्षण घेत आहेत. तरीही पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी कोचिंग क्लासेसचा आसरा का घ्यावा लागतो. मग गुणवत्ता नक्की कोण देत आहे, शाळा की क्लासेस, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासह खासगी क्लासेसवर निर्बंध आणण्याचा प्रयत्नव्हावा, तर ग्रामीण भागाचा शहरात ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर झळकावून विविध क्लासेसकडून विद्यार्थी केवळ आमच्यामुळेच यशस्वी झाला, याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. याकडे विविध संस्था-शाळा दुर्लक्ष करीत असल्याने पालकांकडून लाखोच्या घरात शुल्क आकारून क्लासेसच्या माध्यमातून सर्वसामान्य पालकांची आर्थिक लूट सुरू आहे. शैक्षणिक संस्थेपेक्षा क्लासेसचा खासगी क्लासेसच्या…असल्याचा आविर्भाव अनेक क्लासेस चालकांना आहे. यामध्ये शैक्षणिक संस्था परवानगी असूनही नावारूपाला येताना दिसून येत नाही. क्लासेस हाउसफुल्ल असतात. खासगी क्लासेसना निर्बंध नसल्याने एकंदर दर्जेदार शिक्षण घेणे ही श्रीमंतांचीच बाब झाली आहे का, हा प्रश्न पालकांना विचार करण्यास भाग पाडत आहे. शाळांप्रमाणेच क्लासेसच्या शुल्कावर कोणतेही नियंत्रण नाही. क्लासेस म्हणतील ती रक्कम पालक देण्यास तयार होतात. ही खासगी क्लासेसद्वारे होणारी पिळवणूक रोखण्यासाठी शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. विशेषता जिल्हाधिकारी व शिक्षण विभाग यांनी खाजगी क्लासेस यांच्यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे.आहे. खासगी शिकवणी वर्ग संचालकांकडून ड्रेस, वसतिगृह व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध आमिषे दिली जातात. यापोटी एक ते दीड लाख रुपये वसूल केले जात असून यात सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. मात्र, शिक्षण विभागाचे या सर्व बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.
