दहा गावांतील जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार प्रकरण: सुशांत खवतड व विष्णू घुले यांची चौकशी करा!
घोटाळा होऊन ही अधिकारी गप्प का? अधिकारी कोणाला वाचवतायत?
संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत!
– रोखठोक न्यूज वार्ताहर
केज तालुक्यातील दहा गावांना अद्यापही शुद्ध पाणी मिळालं नसताना, जलजीवन योजनेच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी हडपल्याचा गंभीर आरोप ठेकेदार सुशांत खवतड व त्याचा सहकारी ‘आका’ यांच्यावर करण्यात येत आहे.
या कामांची जबाबदारी जरी ठेकेदार सुशांत खवतड याच्या नावावर असली, तरी प्रत्यक्षात सर्व कामे भाजप कार्यकर्ता घुले हेच चालवत असल्याचे समोर आले आहे. खवतड हे फक्त नावापुरते आहेत, तर कामाचा खरा “आका” घुले आहे, अशी जोरदार चर्चा आहे.
या योजनेंतर्गत दहा गावांत पाईपलाईनसह पाणीपुरवठा यंत्रणा उभारायची होती. मात्र काही गावांत तर अजून खणकाम देखील झालेले नाही. तरीही संपूर्ण बील शासनाकडून उचलण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम किती झाले आणि निधी किती गेला, याचा ताळमेळ बसत नाही.
विष्णू घुले हे सध्या भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. असा माणूस जर स्वतःच्या सर्कलमध्येच इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असेल, तर सामान्य जनतेचे काय?
पंकजा मुंडे यांनी अशा भ्रष्टाचारी लोकांपासून लांब राहिले पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे.
एका कार्यक्रमात घुले यांनी स्वतः कबुल केलं की, “होय, ही जलजीवनची कामं माझीच आहेत.” तर मग आतापर्यंत तो सुशांत खवतड माझ्याशी संबंधित नाही, असं का सांगत होता?
दहा गावांतील नागरिक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहेत. जर आता पाणी मिळालं नाही, तर पावसाळ्यानंतर योजनेचा काही उपयोग राहणार नाही.
भ्रष्टाचाराचा हा गंभीर प्रकार असून सुशांत खवतड आणि घुले यांनी शासनाचा विश्वास घात करून जनतेची फसवणूक केली आहे. दोघांच्या कारवायांची चौकशी झालीच पाहिजे.
त्याच बरोबर ऐवढा मोठा घोटाळा होऊन ही संबंधित विभागाचे अधिकारी गप्प आहेत म्हणजे त्यांचे ही हात यात बरबटलेले दिसत आहेत त्या अनुशंगाने या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन चौकशी झाले पाहीजे.
या प्रकरणातले “भ्रष्टाचारी मासे” लवकरच गळाला लागतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
