पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवने यांना पदभार स्वीकारताच एकाच दिवशी दोन चोरी करून चोरांची सलामी.
केज येथील बस स्टँडहून दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी तसेच दुचाकीच्या डिकीमधून दोन लाख लंपास.
बस स्थानकावरची पोलिस चौकी शोभेला.
रोखठोक न्युज वार्ताहर
केजच्या बस स्टँडवरून चोरीच्या घटनेची मालिका सुरू असून पुन्हा एक महिला बस मध्ये चढत असताना गळ्यातील दोन तोळे वजनाचे गंठण चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. २७जून रोजी दुपारी १२:३० वा. च्या सुमारास जिवाचीवाडी येथील रामकुं वर तुळशीराम तोंडे ही महिला बीडला जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवरून लातूर-संभाजीनगर या गाडीत चढत असताना तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एक अनोळखी महिलेने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तोडून चोरून नेले. त्या अनोखी महिले जवळ एक पर्स देखील असल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही तसेच दुचाकीच्या डिकीमधून दोन लाख लंपास.
बँकेत पैसे जमा करण्यासाठी आलेल्या सीएससी सेंटर चालकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये लंपास केले आहे. ही घटना केज शहरात कळंब रस्त्यावर गुरुवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे, चिल्लर असलेली ३० हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी डिक्कीत तशीच ठेवली.
केज तालुक्यातील उंदरी येथील हर्षल भाऊसाहेब ठोंबरे यांचे केज – अंबाजोगाई रस्त्यावरील चंदनसावरगाव येथे जगदंब सीएससी सेंटर आहे. गुरुवारी त्यांच्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांच्या देवाण -घेवाणीच्या व्यवहारातून त्यांच्याकडे २ लाख ३० हजार रुपये जमा झाले होते. ते पैसे घेऊन केज येथील एसबीआय बँकेत खात्यावर जमा करण्यासाठी दुपारी केंद्र बंद करून आले होते. त्यांनी ही रक्कम दुचाकीच्या (एम. एच. ४४ एएफ ५५५४) डिक्कीत ठेवली होती. बँकेत आल्यानंतर लंच टाइम असल्याने बँक बंद होतीम्हणून हर्षल ठोंबरे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळ कळंब रस्त्यावर त्यांचे मित्र बंटी गायकवाड यांच्या महा-ई-सेवा केंद्रावर आले. हिच संधी साधून पाळत ठेवलेल्या चोरट्याने त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीचे झाकण अवजाराच्या सह्याने उघडले. काही दिवसांपूर्वीच बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बस स्थानकातील पोलीस चौकी बाबत सुचना दिल्यावर चौकी कार्यान्वित केली होती व तिथे दोन पोलीसांची नियुक्ती केली होती तरी पण बस स्थानकातील चोरी वर अंकुश लागला नाही. काही दिवसांपूर्वी नविन पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवने या एकाच दिवसात झालेल्या दोन चोरीमुळे अहवान निर्माण झाले आहे.
