• Thu. Jun 4th, 2026

विष्णू घुले, सुशांत खवतड किती दिवस मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागे लपणार? जलजिवन योजनेतील ३२ कोटींचा घोटाळा अखेर बाहेर येणारच!  

Bybaba maske

Jul 2, 2025

विष्णू घुले, सुशांत खवतड किती दिवस मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागे लपणार?

जलजिवन योजनेतील ३२ कोटींचा घोटाळा अखेर बाहेर येणारच!

✍️ रोखठोक न्यूज वार्ताहर

केज तालुक्यातील चिंचोली सर्कलमधील दहा गावांमध्ये जलजिवन योजनेच्या कामात तब्बल ३२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. हा निधी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी मंजूर झाला होता.

पण या निधीतून जलजिवन योजनेची कामे विष्णू घुले आणि त्याचा सहकारी सुशांत खवतड यांच्या विजय कन्स्ट्रक्शन या फर्मच्या माध्यमातून मंजूर करून घेतली गेली. प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत – फक्त कागदोपत्री दाखवून निधीचा अपहार करण्यात आला.

विशेष म्हणजे, जलजिवन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष करत या घोटाळ्याला हातभार लावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

🔍 प्रश्न उपस्थित होतो — इतक्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यानंतरही या दोघांविरोधात अजून कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही?

पंचक्रोशीतील नागरिक प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी करत असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!