जलजिवन मध्ये घोटाळा करून किती दिवस लपणार विष्णू घुले. कधीना कधी हिशोब देव्याच लागणार!!
रोहन गंलाडे यांचे जलजीवन च्या चौकशी साठी 6 जुलैपासून आमरण उपोषण.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व जलजीवन मिशन योजनेची सरमिसळ केली?
रोखठोक न्यूज वार्ताहर
चिंचोली सर्कलमधील जलजिवन घोटाळ्यातील विष्णू घूले कधी मंत्री पंकजाताई मुंडे किंवा लोकप्रतिनिधीच्या मागे लपतात तर कधी पेड न्यूज देऊन पत्रकारांच्या पाठीमागे लपतायत किती दिवस असे बुरखे घालून लपणार आहेत.ज्या पत्रकारांनी त्यांच्या विरोधात जलजिवन च्या घोटाळ्यातील बातम्या केल्या तेच आज त्यांचे समर्थन करत आहेत याच मुळे या घोटाळ्याची व्याप्ती दिसून येत आहे. त्या काळातील तत्कालीन मंत्री पंकजाताई मुुंडे यांच्या माध्यमातून प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत 32 कोटीचा निधी आणला व त्यातून चिंचोली सर्कलमधील 15 गावाचा पाणी प्रश्न सोडवला हे वृत्त पत्रातून छापून आणत आहेत पण याच गावा साठी “हर घर जल” जलजीवन मिशन योजनेतील कामे सुशांत खवतड यांच्या विजय कन्स्ट्रक्शन मार्फत घेतले मग पंकजाताई मुुंडे यांंच्या कडून आणलेल्या योजनेतंर्गत कामे झाले का जल जीवन मिशन अंतर्गत कामे झाले याचा जबाब कोण देणार?
या योजनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून रोहन गंलाडे हे केज पंचायत समितीसमोर दिनांक 6 जुलैपासून उपोषण करणार आहेत
विष्णू घुले तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी हा घोटाळा उघडकीस येणारच कारण तुम्ही दोन्ही कामाची सरमिसळ करून घोटाळा केलाच आहे हे समस्त पंचक्रोशीतील गावकरी सांगत आहेत.
