• Thu. Jun 4th, 2026

अल्पवयीन मुलीच्या तोंडावर स्प्रे मारला, नंतर झाडाला बांधून पसार.

Bybaba maske

Jul 28, 2025

अल्पवयीन मुलीच्या तोंडावर स्प्रे मारला, नंतर झाडाला बांधून पसार.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

 प्रातः विधीसाठी बाहेर पडलेल्या १७ वर्षीय मुलीच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून तिला वन विभागाच्या हद्दीतील शेतात ओढत नेवून दोरीने झाडाला बांधून टाकत धूम ठोकल्याचा प्रकार शिरूर कासार तालुक्यातील एका गावात शनिवारी घडला. मुलगी उशीर झाला तरी घरी का आली नाही म्हणून तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आईस मुलगी एका झाडाला बांधलेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलीची सुटका केली असून, याप्रकरणी शिरूर पोलिसात अज्ञातावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!