• Sat. Sep 12th, 2026

कथित गोरक्षकांकडून दलित युवकाला मारहाण.

Bybaba maske

Jul 28, 2025

कथित गोरक्षकांकडून दलित युवकाला मारहाण.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

खामगाव शहरात काही कथित गोरक्षकांनी गाय चोरीच्या संशयावरून दलित युवकास बेदम मारहाण केली. या युवकाच्या अंगावर मोकाट गायी सोडल्या आणि त्याची चित्रफीतही तयार केली. या घटनेमुळे दलित संघटना आक्रमक झाल्या असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली असून तिसरा फरार आहे.

रोहन संतोष पैठणकर (वय २१ वर्षे, खामगाव) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. तो एका हॉटेलमध्ये वेटर आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार, रोहन मित्रांसमवेत गप्पा मारत असताना तिथे आलेल्या दोघांनी त्याला जवळच असलेल्या मोकळ्य मैदानात नेले व गाय चोरीच आरोप करीत दगडाने अमानुष मारहाण केली. त्याचे कपडे फाडले, त्याच्या अंगावर मोकाट गायी सोडून त्याची चित्रफीत तयान केली. नंतर त्याला दंडेस्वार्म मंदिर परिसरात नेण्यात आले तिथे आणखी एक युवक आला-या तिघांनी रोहनला पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत त्याचा एक डोळा निकामी झाला. नाकाचे हाडही मोडले. मी गाय चोरली नाही, असे विनवणी करत असतानादेखील मारहाण करण्यात आल्याचे पोलीस तक्रारीत नमूद आहे. रोहनने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गब्बू गुजरिवाल (खामगाव), प्रशांत गोपाल संगेले ( खामगाव) आणि रोहित पगारिया (खामगाव) यांच्या आहेत. विरुद्ध अॅट्रोसिटीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!